प्रकाश आंबेडकर विजयापासून 'वंचित'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 04:34 PM2019-05-23T16:34:47+5:302019-05-23T16:37:43+5:30
सद्याची आकडेवारीचा अंदाज घेतला तर, दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे, वंचित बहुजन आघाडीची. भारिपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. दलित आणि मुस्लीम समाजाचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे त्यांच्या सभेतून जाणवत होते. मात्र, निकालाचे आकडेवारी ज्याप्रमाणे दिसत आहे, त्यात वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद सोडून कुठेच आघाडी मिळताना दिसत नाही. प्रकाश आंबेडकर हे स्वतः पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीला 48 जागा मिळतील असा दावा करणारे, प्रकाश आंबेडकर हे स्वतः विजयापासून 'वंचित' असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरले होते. दोन्ही मतदार संघात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सद्याची आकडेवारीचा अंदाज घेतला तर, दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अकोलामध्ये आंबेकर यांना आतापर्यंत 258896 , भाजपचे संजय धोत्रे 506129 , कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांना 234688 मते पडली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर तिकडे सोलापुरात ही प्रकाश आंबेडकर 280998 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.