राज ठाकरेंच्या सभा विधानसभेची पूर्व परीक्षा का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 12:24 PM2019-04-13T12:24:33+5:302019-04-13T12:27:13+5:30
राज यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी सभा घेणार असल्याचे जाहीर केल्याने महाआघाडीला याचा फायदा होणार. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत घेत असलेल्या सभा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे वातावरणनिर्मीती करत असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात थेट प्रचार सुरु केला आहे. राज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत भाजप विरोधात सभा घेण्याचा निर्णय घेतला. राज यांच्या सभांमुळे युतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे राज यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हायला नको, असे युतीच्या उमेदवारांना वाटत आहे.
राज ठाकरे महाआघाडीत जातीला अशी आशा होती, तशा चर्चा सुद्धा सुरु झाल्या होत्या मात्र अखेर राज ठाकरेंनी महाआघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेतला. राज यांना महाआघाडीत घेण्यावरून कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध होता. राज ठाकरेंनी मागील आपल्या प्रत्येक सभेत मोदींचा समाचार घेतल्याने त्यांच्या सभा चर्चेत आल्या आहे.
राज यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी सभा घेणार असल्याचे जाहीर केल्याने महाआघाडीला याचा फायदा होणार. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत घेत असलेल्या सभा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे वातावरणनिर्मीती करत असल्याचे बोलले जात आहे.
मागील पाच वर्षात मनसेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. राज यांच्या सभेला जमणारी लाखोंची गर्दी मतदानाच्या पेटीत मात्र दिसत नाही. लोकसभा निवडणुकी नंतर होणारी विधनासभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र मागील पाच वर्षात कार्यकर्त्यांनाचा तुटलेला संपर्क आणि त्यांचा उत्साहा वाढवायासाठी राज ठाकरेंनी आपल्या सभेतून पुन्हा जवळ करण्याचा हा प्रयत्न म्हणाव लागेल.
राज ठाकरे घेत असललेल्या सभांच्या ठिकाणी उभा असेलेल महाआघाडीचे उमदेवार जर निवडून आले तर याचा श्रेय काही प्रमाणात राज यांना मिळू शकते. त्याबरोबर विधानसभेत आघाडीत राज यांना सन्मानपूर्वक जागा सुद्धा मिळू शकतात. त्यामुळेच राज ठाकरेंच्या सभा विधानसभेची पूर्व परीक्षा आहे असेच म्हणावे लागेल.