ईव्हीम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर प्रशासनाचा तिसरा डोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 03:42 PM2019-04-22T15:42:45+5:302019-04-22T15:52:42+5:30
मतदानासाठी शासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारपासूनच मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन पाठवायला सुरवात झाली आहे. ईव्हीम सुरक्षितपणे मतदानकेंद्रांवर पाठवण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. ईव्हीम नेण्यात येत असलेले वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान प्रक्रिया मंगळवारी (ता.२३) पार पडणार आहे. निवडणुका शांततेत व्हावेत यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदानकेंद्रांवर पाठवण्यात येत असलेल्या ईव्हीम मशीन सुरक्षित जाव्यात म्हणून वाहनांवर जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांचा नेमके ठिकाण कुठे आहे हे जिल्हा मुख्यालयात बसून पाहता येईल.
मतदानासाठी शासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारपासूनच मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन पाठवायला सुरवात झाली आहे. ईव्हीम सुरक्षितपणे मतदानकेंद्रांवर पाठवण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. ईव्हीम नेण्यात येत असलेले वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीम घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर जिल्हा प्रशासनाला नजर ठेवता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच यावेळी ११ तास मतदान प्रकिया चालणार आहे. उन्हाचा पारा लक्षात घेत निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मतदानावेळी जर एखद्या मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन मध्ये बिघाड जाल्यास पचवीस ते तीस मिनिटांत मशीन बदलता यावी यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ईव्हीम मशीन नेणाऱ्या वाहनांवर जीपीएसचा तिसरा डोळा असल्याने ईव्हीम किती वेळात आणि कुठपर्यंत पोहचल्या आहेत हे मुख्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळेल.