सत्तापरिवर्तन हाच राष्ट्रवादीला 'घरचा आहेर' देणार : उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 02:10 PM2019-04-07T14:10:28+5:302019-04-07T14:13:01+5:30

तुम्ही नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत आणता. तुम्ही अनेकदा पक्षाला घरचा आहेर देता, आता यानंतर तुम्ही पक्षाला कोणता घरचा आहेर देणार, असा प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, देशात सत्तांतर हाच आपला पक्षाला घरचा आहेर असेल.

Lok Sabha Election 2019 Udayan Raj want to NCP in power | सत्तापरिवर्तन हाच राष्ट्रवादीला 'घरचा आहेर' देणार : उदयनराजे

सत्तापरिवर्तन हाच राष्ट्रवादीला 'घरचा आहेर' देणार : उदयनराजे

Next

मुंबई - देशातील स्थिती सध्या गंभीर झालेली आहे. सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सत्तांतर आवश्यक आहे. सत्तांतर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून सत्तांतर करणे हाच आपण राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर देणार असल्याचे सातारा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी उदयनराजे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिले. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्ही नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत आणता. तुम्ही अनेकदा पक्षाला घरचा आहेर देता, आता यानंतर तुम्ही पक्षाला कोणता घरचा आहेर देणार, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, देशात सत्तांतर हाच आपला पक्षाला घरचा आहेर असेल.

दरम्यान सोशल मडियावर प्रसिद्ध असलेले उदयनराजे यांची इतर नेत्यांप्रमाणे आयटी सेल आहे, असं विचारण्यात आले. त्यावर उदयनराजे यांनी आश्चर्यचकित उत्तर देताना म्हटले की, मी स्वत: साधा मोबाईल वापरतात. आपण व्हाट्स एप देखील वापरत नसल्याचे म्हटले.

'मै भी चौकीदार' मोहिमेची उडवली खिल्ली

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचे सर्वच नेते स्वत:ला चौकीदार म्हणवतात. त्यावर तुम्हाला काय वाटते, यावर उदयनराजे यांनी फिरकी घेताना विचारले की, जे चौकीदार म्हणवतात, त्यांना केंद्र सरकारकडून काही पगार, मानधन काही मिळते का ? तसं काही असेल तर मी पण बघतो, असं म्हणत उदयनराजे यांनी या मोहिमेची खिल्ली उडवली.

Web Title: Lok Sabha Election 2019 Udayan Raj want to NCP in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.