औरंगाबादेत मतदारांनी कमळाचं चिन्ह शोधाव तरी कुठं ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 11:05 AM2019-04-11T11:05:33+5:302019-04-11T11:11:24+5:30
औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते.
मोसीन शेख
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अजून सहा टप्प्यात मतदान होणार आहे. पुढील टप्यातील मतदारसंघात प्रचार शिंगेला पोहचला आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते दिवस-रात्र एक करत आहे. मात्र अस असताना प्रचार करताना आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात आपण प्रचार करत होर्डिग बाजी करत असल्याचे भान सुद्धा कार्यकर्त्यांना राहिले नाही.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात युतीकडून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे रिंगणात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा काही भाग जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे भाजपला जालना बरोबर औरंगाबाद मधील काही भागात प्रचार करावा लागत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांनी थेट औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जाऊन कमळाच बटन दाबण्याचे आव्हान करणारे होर्डिग लावल्याने शिवसेनेची उमेदवार चंद्रकांत खैरे यांची डोकीदुखी वाढली आहे.
औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी एव्हीम मशीनवर कमळाचा बटन कुठ शोधावं अशा पोस्ट सोशल मिडिया वायरल होत आहे. तर या होर्डिंग मुळे शिवसेनेचे नेतेमंडळी सुद्धा चक्रावली आहे.