महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 02:33 PM2024-05-13T14:33:17+5:302024-05-13T14:35:47+5:30
पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती.
Maharashtra Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरातील विविध मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये नंदुरबारमध्ये सर्वाधिक ३७.३३ टक्के मतदान झालं असून पुण्यात सर्वांत कमी २६.४८ टक्के मतदान झालं आहे.
कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?
नंदुरबार -३७.३३
जळगाव-३१.७०
रावेर - ३२.०२
जालना - ३४.४२
औरंगाबाद - ३२.३७
मावळ -२७.१४
पुणे - २६.४८
शिरूर - २६.६२
अहमदनगर - २९.४५
शिर्डी - ३०.४९
बीड - ३३.६५
कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात?
मतदारसंघ आणि उमेदवारांची संख्या
नंदुरबार - ११
जळगाव - १४
रावेर - २४
जालना - २६
औरंगाबाद - ३७
मावळ - ३३
पुणे - ३५
शिरुर - ३२
अहमदनगर - २५
शिर्डी - २०
बीड - ४१
दरम्यान, महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी आज मतदान होत आहे.