कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 07:03 AM2024-04-26T07:03:17+5:302024-04-26T07:03:44+5:30

उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जमा केले जाते

Lok sabha election - Confidence was full, but the deposit was lost; 768 candidates were affected | कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका

कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका

नवी मुंबई : राज्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम रिंगणात असलेल्या एकूण ८६७ उमेदवारांपैकी ७६८ उमेदवारांना आपले डिपाॅझिट गमवावे लागले हाेते. गेल्या खेपेला अवघ्या ९९ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले होते. यात विजयी उमेदवारांचाही समावेश आहे

डिपॉझिट किती रुपये ?
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना २५ हजार रुपये, तर एससी-एसटी या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतात.

कुणाचे होते जप्त ?
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जमा केले जाते. मात्र, यापेक्षा जास्त जर मते मिळाली तर त्याचे डिपॉझिट त्याला परत केले जाते. मात्र, एखाद्याने उमेदवारी मागे घेतली किंवा त्याची उमेदवारी रद्द झाली तर त्याला भरलेले डिपॉझिट परत केले जाते.

१९२ अर्ज झाले छाननीत बाद

२७३ उमेदवारांची माघार
  
८६७ रिंगणात

Web Title: Lok sabha election - Confidence was full, but the deposit was lost; 768 candidates were affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.