तुमच्या मतदारसंघात मतदान कधी? जाणून घ्या, महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 04:46 PM2024-03-16T16:46:43+5:302024-03-16T16:47:53+5:30
Lok Sabha Election Dates 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Lok Sabha Election Dates 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यांत होणार असून, निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा टप्पा १ जूनला होणार आहे. यात महाराष्ट्र्रातील निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत.
महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे या तारखांना निवडणुका होणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणुका
पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
दुसरा टप्पा २६ एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
तिसरा टप्पा ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
चौथा टप्पा १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.
पाचवा टप्पा २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, तसेच मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य या सहा मतदारसंघांचीही निवडणूक या दिवशीच होणार आहे. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे.
कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर – दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर छत्तीसगड आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये चार टप्प्यांत, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.