लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 03:06 PM2019-05-23T15:06:00+5:302019-05-23T15:26:31+5:30

अनेक ठिकाणी आम्ही खूप कमी मतदानाने पराभूत झालो आहोत. याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत

Lok Sabha election results 2019: No expected results, but people decision agree; Sharad Pawar | लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार 

लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार 

Next

पुणे - लोकसभा निवडणुकीचा निकाल आम्हाला अपेक्षित होता पण तसा निकाल आला नाही. लोकांनी जे मतदान केलं त्यांचे आभार मानतो, कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांचे धन्यवाद देतो. लोकांचा निर्णय मान्य आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत जे यश भाजपाला मिळालं होतं त्यामधील मताधिक्य यंदाच्या निवडणुकीत कमी झालं आहे. निकालांची चिंता न बाळगता दुष्काळग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत करण्याची भूमिका आहे. अनेक ठिकाणी आम्ही खूप कमी मतदानाने पराभूत झालो आहोत. याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संपर्क ठेऊन जनाधार वाढविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करतील. रायगड, बारामती, शिरुर, सातारा या चार मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झालेली आहेत. अमरावती आणि माढ्यात अटीतटीची लढत आहे त्याचं चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.  

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने कधी जिंकला नव्हता. तिथे पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करु शकलो असं भाष्य पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवारांनी दिली. तसेच मी निवडणूक लढवणार नव्हतो हे 2014 साली ठरवलं होतं. मी राज्यसभेचा सदस्य होतो. माढ्यातील पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नव्हती म्हणून मी तुमच्यात एकवाक्यता नसेल तर मी लढतो असं बोललो होतो असं पवारांनी स्पष्ट केलं. 

राज ठाकरे यांच्या सभांचा किती फायदा झाला यावर बोलताना शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं. मनसेने उमेदवार उभे केले नव्हते, जर त्यांनी लोकसभेत उमेदवार उभे केले असते तर बहुदा चित्र वेगळं दिसलं असतं असा अंदाज पवारांनी दिला. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत. अजूनही काही मतदारसंघात मतमोजणी सुरु आहे. त्याठिकाणीही काही जागांवर विजय मिळू शकतो अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. 
 

Web Title: Lok Sabha election results 2019: No expected results, but people decision agree; Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.