पहिला टप्प्यात गडकरींसह सात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:25 PM2019-03-26T12:25:21+5:302019-03-26T12:34:25+5:30

पहिल्या टप्प्यात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासह सात केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहे. या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात तीन माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांचे वारसदार यांच्यावरही लक्ष राहणार आहे.

lok sabha elections 2019 in first phase seven central in the fray | पहिला टप्प्यात गडकरींसह सात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पहिला टप्प्यात गडकरींसह सात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. या टप्प्यात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासह सात केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहे. या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात तीन माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांचे वारसदार यांच्याकडेही लक्ष राहणार आहे.

नितीन गडकरी

  • पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणुकीच्या आखाड्यात

  • भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोलेंचे खडतर आव्हान

  • नाना पटोले यांनी मोदींवर टीका करत काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश

  • २०१४ मध्ये गडकरींचा २.८४ लाख मतांना विजयी

    हंसराज अहिर

  • गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर निवडणुकीच्या रिंगणात

  • २०१४ मध्ये २.३६ लाख मतांनी विजयी

  • सलग तीन वेळा विजय

  • काँग्रेसच्या सुरेश धानोरकरांचे कडवे आव्हान

  • काँग्रेसने ऐनवेळी बदलला उमेदवार

सुशील कुमार शिंदे

  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अन् माजी केंद्रीय गृहमंत्री

  • सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात

  • मुख्य लढत भाजप व्यतिरिक्त प्रकाश आंबेडकर यांच्याशी

महेश शर्मा

  • केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा

  • गौतमबुद्ध नगर मतदार संघातून उमेदवार

  • २०१४ मध्ये २.८० मतांनी विजय

  • सपा-बसपाशी आणि काँग्रेसशी मुख्य लढत

व्ही.के. सिंह

  • माजी सेनाप्रमुख आणि केंद्रीयमंत्री

  • दुसऱ्यांना गाझीयाबादमधून भाजप उमेदवार

  • २०१४ मध्ये ५.६७ लाख मतांना विजयी

  • सपा-बसपाच्या सुरेश कुमार यांच्यासह काँग्रेसच्या डॉली शर्माशी लढत

किरण रिजिजू

  • केंद्रीय गृहराज्य मंत्री

  • २०१४ मध्ये ४१ हजार मातांनी विजयी

  • अरुणाचल पश्चिममधून उमेदवार

सत्यपाल सिंह

  • मुंबईचे माजी पोलिस आयुक्त

  • २०१४ मध्ये २ लाख मतांनी विजय

  • जयंत सिंह यांचे आव्हान

  • जयंत सिंह यांना सपा-बसपाचे समर्थन

हरिष रावत

  • माजी मुख्यमंत्री

  • उत्तराखंडमधील नैनिताल-उधमसिंह नगरमधून उमेदवार

  • भाजपच्या अजय भट्ट यांचे आव्हान

नेत्यांच्या वारसदारांकडे लक्ष

  • तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखऱ राव यांची मुलगी निजामाबादमधून उमेदवार

  • रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान जमुईमधून उमेदवार

  • रालोद प्रमुख अजित सिंह यांचे चिरंजीव जयंत चौधरी निवडणुकीच्या रिंगणात

     

 

 

 

    Web Title: lok sabha elections 2019 in first phase seven central in the fray

    Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.