Lok Sabha election 2019: वंचित बहुजन आघाडी 'फॉर्मात', ३७ उमेदवार एकाच झटक्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:07 PM2019-03-15T16:07:50+5:302019-03-15T16:08:25+5:30
केवळ ११ मतदारसंघ वगळता, ३७ उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकलीय.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली आहे. केवळ ११ मतदारसंघ वगळता, ३७ उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकलीय. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एमआयएमनं आधीच स्पष्ट केलंय. परंतु, त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर म्हणाले. तसंच, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं.
वंचित बहुजन आघाडीच्या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्याची जातही नमूद करण्यात आली आहे. सर्वच वंचित घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं या यादीत पाहायला मिळतं.
वंचित बहुजन आघाडीचे ३७ उमेदवार असेः
१. वर्धाः धनराज वंजारी
२. रामटेकः किरण रोडगे-पाटनकर
३. भंडारा-गोंदियाः एन. के. नान्हे
४. गडचिरोली-चिमूरः डॉ. रमेश गजबे
५. चंद्रपूरः अॅड. राजेंद्र महाडोळे
६. यवतमाळ-वाशिमः प्रो. प्रवीण पवार
७. बुलडाणाः बळीराम सिरस्कार
८. अमरावतीः गुणवंत देवपारे
९. हिंगोलीः मोहन राठोड
१०. नांदेडः प्रा. यशपाल भिंगे
११. परभणीः आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
१२. बीडः प्रा. विष्णू जाधव
१३. उस्मानाबादः अर्जुन सलगर
१४. लातूरः राम गारकर
१५. जळगावः अंजली रत्नाकर बाविस्कर
१६. रावेरः नितीन कांडेलकर
१७. जालनाः डॉ. शरदचंद्र वानखेडे
१८. रायगडः सुमन कोळी
१९. पुणेः अनिल जाधव
२०. बारामतीः नवनाथ पडळकर
२१. माढाः अॅड. विजय मोरे
२२. सांगलीः जयसिंग शेंडगे
२३. साताराः सहदेव एवळे
२४. रत्नागिरी-सिंधुदुर्गः मारुती रामचंद्र जोशी
२५. कोल्हापूरः डॉ. अरुणा माळी
२६. हातकणंगलेः अस्लम बादशाहजी सय्यद
२७. नंदुरबारः दाजमल गजमल मोरे
२८. दिंडोरीः बापू केळू बर्डे
२९. नाशिकः पवन पवार
३०. पालघरः सुरेश अर्जुन पडवी
३१. भिवंडीः डॉ. ए. डी. सावंत
३२. ठाणेः मल्लिकार्जुन पुजारी
३३. मुंबई दक्षिणः डॉ. अनिल कुमार
३४. मुंबई दक्षिण मध्यः डॉ. संजय भोसले
३५. ईशान्य मुंबईः संभाजी शिवाजी काशीद
३६. मावळः राजाराम पाटील
३७. शिर्डीः डॉ. अरुण साबळे
#Maharashtra: Prakash Ambedkar's Vanchit Bahujan Aghadi has released first list of 37 candidates for upcoming Lok Sabha elections. (file pic) pic.twitter.com/pozoWllDvw
— ANI (@ANI) March 15, 2019