राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:38 PM2024-05-11T21:38:45+5:302024-05-11T21:43:45+5:30
महत्वाचे म्हणजे, या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे...
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या 48 तास आधीच, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, बीड, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डीमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. चौथ्या टप्प्यात कुठे काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट), कुठे काँग्रेस आणि भाजप, तर कुठे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवार आमनेसामने असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
चौथ्या टप्प्यात या नेत्यांमध्ये असे फाइट -
नंदुरबार : हीना गावित (भाजप) VS गोवाल पदवी (काँग्रेस)
जळगाव : स्मिता वाघ (भाजप) VS करन पवार (शिवसेना-ठाकरे गट)
रावेर- रक्षा खडसे VS श्रीराम पाटिल (एनसीपी-शरद पवार गट)
जालना- रावसाहेब दानवे (भाजप) VS कल्याण काळे (काँग्रेस)
औरंगाबाद- संदीपराव भुमरे (शिवसेना- शिंदे गट) VS चंद्रकांत खैरे (शिवसेना-ठाकरे गट)
बीड- पंकजा मुंडे (भाजप) VS बजरंग मनोहर सोनावणे (एनसीपी-शरद पवार गट)
मावल- श्रीरंग बर्ने (शिवसेना- शिंदे गट) VS संजोग वाघरे पाटिल (शिवसेना-ठाकरे गट)
पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप) VS रविंद्र हेमराज दांगेकर (काँग्रेस)
शिरूर- शिवाजीराव अढळराव पाटिल (एनसीपी - अजित पवार गट) VS अमोल कोल्हे (एनसीपी- शरद पवार गट)
अहमदनगर - सुजय विखे पाटिल (भाजप) VS नीलेश लंके (एनसीपी-शरद पवार गट)
शिरडी - सदाशिव लोखंडे VS भाउसाहेब राजाराम (शिवसेना-ठाकरे गट)
पहिले तीन टप्पे -
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी 54.77 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात आठ जागांसाठी मतदान झाले. मात्र या टप्प्यातही केवळ 53.51 टक्केच मतदान झाले. राज्यात पहिल्या टप्प्यात पाच जागांवर मतदान झाले. यात नागपुरच्या जागेचाही समावेश होता. येथून नितीन गडकरी मैदानात होते.