लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार?; बावनकुळे म्हणाले, "२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस...." 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 04:43 PM2023-03-29T16:43:33+5:302023-03-29T16:44:24+5:30

आपल्याला संपूर्ण जागांवर काम करायला लागेल. जे आमचे नेतृत्व ठरवेल तेवढ्या जागा लढवणार आहे

Lok Sabha, Vidhan Sabha elections to be combined?; BJP Chandrashekhar Bawankule spoke clearly | लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार?; बावनकुळे म्हणाले, "२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस...." 

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार?; बावनकुळे म्हणाले, "२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस...." 

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणार येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. अशाप्रकारे कुठलीही शक्यता नसून या बातमीत काही तथ्य नाही असा खुलासा बावनकुळेंनी केला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आगामी वर्षात २०२४-२५ चा बजेट देवेंद्र फडणवीसच मांडतील, लोकसभा-विधानसभा एकत्रित होणार नाहीत. मोदी केंद्रात पुन्हा येणारच आहेत. त्यामुळे निवडणुका आधी घेण्याचा संबंध नाही. विधानसभा लोकसभा एकत्र घेण्याच्या बातमीला अर्थ नाही. ठरलेल्या कालावधीतच निवडणुका घेतल्या जातील असं त्यांनी म्हटलं. 

भाजपा ताकद वाढवतेय 
शिंदेंना ५० जागा देऊ असं म्हटलं नाही तर मी प्रवक्ता बैठकीत असं म्हटलं होतं. शिंदेंकडे ५० आमदार आहेत. भाजपाकडे १०५ आणि काही अपक्ष आहेत. आपल्याला संपूर्ण जागांवर काम करायला लागेल. जे आमचे नेतृत्व ठरवेल तेवढ्या जागा लढवणार आहे. जितक्या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढेल तिथे शिवसेना उमेदवार उभे राहतील तिथेही मदत होणार आहे. युतीत असतानाही आम्ही २८८ जागांची तयारी करायचो. संपूर्ण महाराष्ट्राची आम्ही तयारी करतो, फक्त विधानसभा नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समिती वेगवेगळ्या निवडणुका असतात. जागावाटपाची बातमी चुकीची आहे. आमची ताकद आम्ही वाढवतोय. शिवसेनेच्या उमेदवारांनाही प्रचंड ताकदीने शक्ती लावून निवडून आणणार आहोत असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. पण आता खूप काळ लागणार नाही. महाराष्ट्रालाही विस्ताराची गरज आहे. पालकंत्र्यांवर २-३ जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे आणि तो होईल असा दावा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

Web Title: Lok Sabha, Vidhan Sabha elections to be combined?; BJP Chandrashekhar Bawankule spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.