लोकमंगलच्या वतीने मंगळवारी तीन राज्यात २५१ ठिकाणी कवी संमेलने

By Admin | Published: July 4, 2016 07:48 PM2016-07-04T19:48:57+5:302016-07-04T19:48:57+5:30

लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मंगळवार पाच जूलै रोजी आषाढाच्या पहिल्या दिवषी महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यात २५१ ठिकाणी कवी संमेलन आयोजितकेली आहेत

On Lokmangal's behalf, on 251 poets in 25 different places of poetry | लोकमंगलच्या वतीने मंगळवारी तीन राज्यात २५१ ठिकाणी कवी संमेलने

लोकमंगलच्या वतीने मंगळवारी तीन राज्यात २५१ ठिकाणी कवी संमेलने

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. ४ : लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मंगळवार पाच जूलै रोजी आषाढाच्या पहिल्या दिवषी महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यात २५१ ठिकाणी कवी संमेलन आयोजितकेली आहेत अशी माहिती बँकेचे दिनकर देषमुख यांनी दिली. आषाढ महिन्याचा पहिला दिवस संपूर्ण भारतभर कवी कुलगुरू कालीदास दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शहर, जिल्हा, राज्य कर्नाटक व छत्तीसगडमध्येअसा उपक्रम आयोजित केला आहे़ ही कविसंमेलन लोकमंगल समुहातील विविध संस्था आयोजित करणार आहेत. यामध्ये कर्नाटकात ५, छत्तीसगड १ लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने १२५ लोकमंगल बँकेच्या वतीने ४७ , लोकमंगल सार्वजनिक वाचनालय व पतसंस्था ३० लोकमंगल महाविद्यालय १५, लोकमंगल शेती कडून २, लोकमंगल फौंडेशनकडून २ लोकमंगल बायोटेक, सुपरबाझार, हॉस्पीटल आवंतीनगर शिक्षण संस्था बचतगट आदीकउून प्रत्येकी एक अशी एकूण २५१ कवी संमेलन आयोजित करण्यात आली आहेत़ लोकमंगल सार्वजनिक वाचनालय व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हिराचंद नेमचंद वाचनालययाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजता . या कार्यक्रमाला जेष्ठ कवी रामदास फुटाणे सहभागी होणार आहेत़ अशा प्रकारच्या कवी संमेलनाचे हे चौथे वर्षे आहे. गतवर्षाच्या कवीसंमेलनात १५०० पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यचे आवाहन देशमुख यांनी केले आहे़

Web Title: On Lokmangal's behalf, on 251 poets in 25 different places of poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.