राज्यात यंदापासून ‘लोकमान्य उत्सव’

By Admin | Published: July 24, 2016 03:25 AM2016-07-24T03:25:25+5:302016-07-24T03:25:25+5:30

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच २०१६ हे वर्ष लोकमान्यांचे

Lokmanya Utsav | राज्यात यंदापासून ‘लोकमान्य उत्सव’

राज्यात यंदापासून ‘लोकमान्य उत्सव’

googlenewsNext

मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच २०१६ हे वर्ष लोकमान्यांचे १६० वे जयंती वर्ष आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला पुढील वर्षी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्य शासनाने २०१६ व २०१७ यावर्षी ‘लोकमान्य उत्सव’ व ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ साजरा करण्याचे ठरविले आहे.
‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ची सुरुवात ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ हा उपक्रम ५ ते १५ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तालुका, जिल्हा, विभाग स्तरांवर स्पर्धा आयोजित करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदी विषयांबाबत मूल्यांकन करुन शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात येईल व रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येतील, असेही तावडे म्हणाले.
प्राप्त गुणांनुक्रमाच्या आधारे त्यांच्या तालुक्यामधील प्रथम, द्वितीय व तृतीय, पारितोषिक प्राप्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येतील. बृहन्मुंबईतील सार्वजनिक मंडळांची संख्या लक्षात घेता, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना कोकण विभागातून वगळून दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विभागाप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील. या अभियानाला गणेशोत्सव मंडळांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

तीन स्तरांवर बक्षिसे देणार

समिती स्तरप्रथम विजेतेद्वितीय विजेतेतृतीय विजेते
विभागीय२,००,०००१,५०,०००१,००,०००
जिल्हा १,००,०००७५,००० ५०,०००
तालुका २५,०००१५,००० १०,०००

Web Title: Lokmanya Utsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.