लोकमत अस्पायर एज्युकेशन
By admin | Published: May 10, 2014 10:15 PM2014-05-10T22:15:59+5:302014-05-10T22:22:11+5:30
अस्पायर एज्युकेशन फेअर २0१४
वाशिम : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्या लोकमत समुहातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अस्पायर एज्युकेशन फेअर २0१४ हा दर्जेदार शैक्षणिक उपक्रम (प्रदर्शन) ३0 मे ते १ जून २0१४ दरम्यान श्री लॉन्स नवीन बस स्थानकाजवळ, सिव्हील लाईन्स रोड, अकोला येथे घेण्यात येणार आहे. जून महिना जवळ येतो तसेच पालक व विद्यार्थ्यांच्या मानत अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी लोकमतने हा उपक्रम आयोजित केलेला आहे. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा या पासून ते कोणत्या कोर्समुळे पाल्यांचे भवितव्य उज्वल होईल, कोणत्या कोर्ससाठी कोणते महाविद्यालय दर्जेदार आहे, निवडलेल्या दर्जेदार कोर्ससाठी महाविद्यालयाला अनुदान आहे की नाही व शुल्क किती आहे. अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे अस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून मिळणार आहेत. महाविद्यालयाबरोबरच शाळा, ट्युशन आणि इतर क्लासेसही माहिती एकाच छताखाली येथे मिळणार आहे. विद्यार्थी आणि महाविद्यालयातील दरी कमी करण्यासाठी संस्थांना ही सुवर्ण संधी आहे. महाविद्यालय, शाळा, मेडीकल, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठ, मुक्त विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, कॉम्प्युटर संबंधी सर्व प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करुन देणारे क्लासेस, अँनीमेशन, फॅशन डिझाईनींग, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लॅँग्वेजेस अश्या व्होकेशनल शिक्षण देणार्या कॉलेजस बरोबर आयटीआय, पॉलीटेक्नीक, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट, कॅपीटल मार्केट, मास्क कम्युनिकेशन व मिडीया सर्व इन्स्टीट्यूट व्यवसायीकांना अस्पायर एज्युकेशन फेअर २0१४ या प्रदर्शनामध्ये सहभागी होवून लाखो विद्यार्थी व पालकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. सहजरित्या प्रवेश कसा मिळेल या पालकांच्या प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनात मिळणार आहे.