सुखकर प्रवासासाठी ‘लोकमत आॅटो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 03:26 AM2018-03-09T03:26:32+5:302018-03-09T03:26:51+5:30
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात सर्वसामान्य प्रवासी, पर्यटक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: महिलांचा रिक्षा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी यापुढे हातभार लागणार आहे.
औरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात सर्वसामान्य प्रवासी, पर्यटक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: महिलांचा रिक्षा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी यापुढे हातभार लागणार आहे. ‘लोकमत आॅटो’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ जागतिक महिला दिनी गुरुवारी १०० रिक्षांच्या माध्यमातून करण्यात आला. लोकमत भवन, जालना रोड येथे आयोजित समारंभास प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण (वाहतूक शाखा), छावणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ‘लोकमत’चे संपादक चक्रधर दळवी, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे, संयोजक शेख इश्तियाक समीर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रिक्षांना झेंडी दाखवून या उपक्रमाचे उद््घाटन
क रण्यात आले.