लोकमत रक्तदान मोहीम: दहा दिवसांत २४ हजार जणांनी केले रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 09:36 AM2021-07-11T09:36:31+5:302021-07-11T09:37:04+5:30

राज्यभरात ४७५ कॅम्प, रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावतोय.

Lokmat Blood Donation Campaign 24000 people donated blood in ten days | लोकमत रक्तदान मोहीम: दहा दिवसांत २४ हजार जणांनी केले रक्तदान

लोकमत रक्तदान मोहीम: दहा दिवसांत २४ हजार जणांनी केले रक्तदान

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यभरात ४७५ कॅम्प, रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावतोय

मुंबई : संकटकाळात धावून जाण्याची महाराष्ट्राची परंपरा जोपासत, राज्यातील तब्बल २४ हजार लोकांनी पुढे येत रुग्णांसाठी ‘रक्ताचं नातं’ जोडण्याचा आपुलकीचा प्रयत्न केला आहे. ‘लोकमत’ समूहाने सुरू केलेल्या रक्तदान मोहिमेच्या दहाव्या दिवशी राज्यातून २४,३४२ जणांनी रक्तदान करीत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी मनापासून प्रामाणिक प्रयत्न केला आहे. 

एक जुलै रोजी महाराष्ट्रात फक्त १९ हजार युनिट रक्त शिल्लक होते. दोन जुलै रोजी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत ‘लोकमत’ने राज्यभर रक्तदान मोहिमेची सुरुवात केली. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मदतीने ही मोहीम राज्यभर सुरू आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने या मोहिमेतून राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मधील रुग्णांसाठी रक्त गोळा करण्याचे काम सुरू आहे. 

या मोहिमेत दहा दिवसांत २४ हजार लोकांनी पुढे येत रक्तदान केले. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी केवळ सहकाऱ्यांना आदेश न देता स्वतः रक्तदान करीत आपापल्या जिल्ह्यात आदर्श घालून दिला आहे.  

नाशिकमध्ये गणेश जगदीश शेजवळ आणि दीपाली गणेश शेजवळ या पती-पत्नीने एकत्रित येऊन रक्तदान केले. नाशिकमध्येच प्रशांत गाडगीळ आणि अथर्व गाडगीळ या पिता-पुत्रांनीदेखील  रक्तदान केले. वडिलांचे १०३ वे, तर अथर्वचे पहिले रक्तदान होते. आपण आपल्या वडिलांचे रेकॉर्ड मोडू, असा विश्वास अथर्वने यावेळी व्यक्त केला.

कुठे, किती लोकांनी घेतला सहभाग?
महाराष्ट्रातील जनतेने दिलेला हा भरभरून प्रतिसाद आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत सोलापूर २२८१, नागपूर १९६७, कोल्हापूर १७१६, औरंगाबाद १२९३, ठाणे १२४६, सातारा ११६९, अहमदनगर १०१२, पुणे ९४६, नाशिक ९१५, जळगाव ८८१, मुंबई ६३१, नवी मुंबई ८१७ एवढ्या लोकांनी रक्तदान केल्याची नोंद झाली आहे.

Web Title: Lokmat Blood Donation Campaign 24000 people donated blood in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.