लोकमत ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कारांचे वितरण : मराठी मातीतील उद्यमशीलतेला ‘सलाम’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:45 AM2018-03-12T03:45:58+5:302018-03-12T03:45:58+5:30

शून्यातून उद्योगाचे रोपटे वाढविलेले किंवा स्वमेहनतीने राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा वाटा ठरलेले उद्योजक असो वा स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योगविश्वात उडी घेतलेली तरुणाई असो, अशा मराठी मातीतील उद्यमशीलतेला ‘लोकमत’ने पुरस्कारांद्वारे ‘सलाम’ केला.

 Lokmat 'Corporate Excellence' award distribution: Marathi 'Entrepreneurship' | लोकमत ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कारांचे वितरण : मराठी मातीतील उद्यमशीलतेला ‘सलाम’  

लोकमत ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कारांचे वितरण : मराठी मातीतील उद्यमशीलतेला ‘सलाम’  

Next

मुंबई : शून्यातून उद्योगाचे रोपटे वाढविलेले किंवा स्वमेहनतीने राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा वाटा ठरलेले उद्योजक असो वा स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योगविश्वात उडी घेतलेली तरुणाई असो, अशा मराठी मातीतील उद्यमशीलतेला ‘लोकमत’ने पुरस्कारांद्वारे ‘सलाम’ केला. यंदा चौथे वर्ष असलेला ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कार वितरणाचा हा रंगारंग कार्यक्रम वरळी भागातील फोर सीझन्स हॉटेलमध्ये दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
उद्योग क्षेत्रात वेगळे व महत्त्वाचे काम केलेल्या उद्योजकांचा दरवर्षी ‘लोकमत’कडून पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा या सोहळ्यात राज्यभरातील उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व त्यात होते. हिंदी सिने अभिनेता सोनू सुद व ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता शशांक केतकर हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
खासदार अरविंद सावंत, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, फॅशन डिझायनर शायना एन.सी., मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर) कैसर खालिद, अन्न व औषधे प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर यांच्यासह प्रशासकीय सेवेतील अधिकारी, राजकीय नेते, उद्योजक आदी मान्यवरांची या सोहळ्याला खास उपस्थिती होती.
विजय दर्डा यांनी स्वागत भाषणात ‘लोकमत’ची पुरस्कार देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना, हा उद्योजकांच्या मेहनतीचा सन्मान असल्याचे मत मांडले. ‘लोकमत’ हे केवळ एक वृत्तपत्र नाही, तर ही एक चळवळ आहे. १९१८ मध्ये ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधातील लढ्यातून ही चळचळ उभी राहिली. लोकमान्य टिळकांनी ‘लोकमत’ नाव दिले. यामुळेच ‘लोकमत’ कायम सामाजिक दायित्व मानत आलेला आहे. समाजात चांगले कार्य करणाºयांना आधुनिक व्यासपीठ प्रदान करण्याचे काम ‘लोकमत’कडून सातत्याने केले जाते. वाचक हाच ‘लोकमत’चा मालक आहे; त्याच्या हिताशी कधीच तडजोड केली जात नाही.
देशाच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावण्याचे काम कायम महाराष्टÑाने केले आहे. इथे पुरस्कृत होणाºया उद्योजकांनीही स्वमेहनतीने राज्याच्या औद्योगिक व सामाजिक विकासाला हातभार लावला आहे. त्यासाठी हा सन्मान आहे. इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण समाजात बदल घडवून आणण्यासाठी आला आहे. यामुळेच समाजातील अखेरच्या व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्याच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी योगदान द्यावे. त्यातून आपले राष्टÑ मोठे होऊ शकणार आहे, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले.
दिल्लीतील सर्व मराठी वर्तमानपत्रे ही शिळी असतात. अशा वेळी तेथे केवळ एकच ताजे मराठी वर्तमानपत्र निघते ते म्हणजे
‘लोकमत, अशा भावना खासदार अरविंद सावंत यांनी मांडल्या.
सर्वोत्तम निकाल हे असाधारण कार्यातून येतात आणि असाधारण काम आहे म्हणून सर्वोत्तम अर्थात एक्सलन्स आहे. त्यामुळे इथे पुरस्कृत होणारा प्रत्येक जण हा असाधारण आहे, असे मत खासदार सावंत यांनी व्यक्त केले.
मनुनीतीमध्ये प्रत्येकाने काही ना काही दान करावे, असे लिहिले आहे. आपल्या कमाईतील काही तरी
टक्का हा दान करावा, ही ती संकल्पना आहे. समाजात दोन प्रकार असतात, घेणारे व देणारे. पण घेणाºयांना रात्रीची झोप लागत नाही तर देणाºयांना सुखाची झोप लागते. यामुळे प्रत्येकाने दान करावे, असे आवाहन शायना एन.सी. यांनी या वेळी केले. आरोग्याच्या जागरूकतेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सोनू सुद याने प्रत्येकाने रोज व्यायाम करावा. आपण जसे जेवतो, तसा रोज व्यायाम हवाच, असे आवाहन उपस्थितांना केले.
मनी ट्रेड कॉइन ग्रुप हे टायटल स्पॉन्सर व मोहन ग्रुप हे प्रायोजक
होते. साई इस्टेट कन्सल्टंट लिमिटेड, रिजन्सी ग्रुप हे सहप्रायोजक, ग्रीन लॅण्ड फार्म आऊटडोअर हे ट्रॉफी पार्टनर, रोनक अ‍ॅडव्हर्टायझिंग हे पार्टनर, विक्रांत अ‍ॅडव्हर्टायझिंग फ्लेक्स पार्टनर, सुला वाइन्स ब्रेव्हरेज पार्टनर तर बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन हे नॉलेज पार्टनर होते. ‘ड्रायव्हिंग बिझनेस एक्सलन्स’ या विषयावर चर्चासत्रही या सोहळ्यावेळी रंगले.

लोकमत’ म्हणजे निकालाचे ठिकाण
शाळा-कॉलेजमध्ये असताना ‘लोकमत’ हे आमच्यासाठी परीक्षांच्या निकालाचे ठिकाण होते, अशी आठवण अभिनेता सोनू सुद याने सांगितली. मूळ नागपूरचा असलेल्या सोनूचे कॉलेज शिक्षण नागपुरातच झाले. त्या वेळी विद्यापीठांचे निकाल हे ‘लोकमत’मध्ये येत असत. यामुळे आम्ही मुलं निकालाच्या आदल्या दिवशी रात्रीपासून ‘लोकमत’ कार्यालयासमोर जमा होत असू. आज त्याच ‘लोकमत’च्या मंचावर आल्याचा आनंद असल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या.

भूषण गगराणी यांची उपस्थिती
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावून विमानतळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केल्याने गगराणी सध्या चर्चेत आहेत. मुंबईत २०१५ मध्ये ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी एमआयडीसीचे तत्कालीन सीईओ या नात्याने त्यांच्याकडे होती. विशेष म्हणजे आताचा विमानतळ प्रकल्प आणि मेक इन इंडिया या दोन्ही कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.

संजय भाटिया यांचाही सहभाग
मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन असलेले संजय भाटिया यांचादेखील ‘लोकमत’च्या कार्यक्रमात सहभाग लाभला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला निर्णायक गती प्राप्त करून दिली. मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन म्हणून गेल्या दोन वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. विशेषत: क्रूझ वाहतुकीला चालना, बीपीटीच्या जमिनीचा विकास, जल पर्यटनाला चालना देण्यासाठी भाऊचा धक्का, बंदर जेट्टीच्या विकासाला गती या कामांमुळे भाटियादेखील चर्चेतील अधिकारी ठरले आहेत.

Web Title:  Lokmat 'Corporate Excellence' award distribution: Marathi 'Entrepreneurship'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.