Lokmat Digital Influencer Awards 2021: सोशल मीडियातील मिलेनिअर्सचा ‘लोकमत’तर्फे आज गौरव, देशातील सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सर एका व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:28 AM2021-12-02T07:28:32+5:302021-12-02T09:11:32+5:30

Lokmat Digital Influencer Awards 2021:  सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने  लोकमत DIA (Digital Influencer Awards) देऊन गुरूवारी गौरव करण्यात येणार आहे.

Lokmat Digital Influencer Awards 2021: Millionaires on social media honored by 'Lokmat' today, the country's superstar digital influencers on a platform | Lokmat Digital Influencer Awards 2021: सोशल मीडियातील मिलेनिअर्सचा ‘लोकमत’तर्फे आज गौरव, देशातील सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सर एका व्यासपीठावर

Lokmat Digital Influencer Awards 2021: सोशल मीडियातील मिलेनिअर्सचा ‘लोकमत’तर्फे आज गौरव, देशातील सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सर एका व्यासपीठावर

googlenewsNext

पुणे :  सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने  लोकमत DIA (डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड) देऊन गुरूवारी गौरव करण्यात येणार आहे. कोट्यवधी लाईक्स, लाखो कॉमेंटस आणि संपूर्ण जगातून व्ह्यू मिळविणारे हे सोशल मीडियातील मिलेनिअर्सच प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडण्यात डिजीटल इन्फ्लूअन्सरचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियाला संवादाचे प्रभावी माध्यम त्यांनी बनविले आहे. लोकमत माध्यम समुहाच्या वतीने डिजीटल इनफ्लूअनर्सना प्रथमच एका व्यासपीठावर आणून सन्मान करण्याबरोबरच नेटवर्कींगची संधी देण्यात येणार आहे.

जोश शॉर्ट व्हिडीओ ॲप इन्स्टॉल करण्यासाठीक्लिक करा!

जोश शॉर्ट व्हिडीओ ॲप हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये लॉच झालेले हे ॲप पूर्णपणे भारतीय असून देशात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. प्ले स्टोअरवर आत्तापर्यंत १०० मिलियनहून (दशलक्ष) अधिक डाऊनलोड झाले आहेत. १२४ मिलियन सक्रिय वापरकर्ते आहेत. १४ भारतीय भाषांमध्ये हे उपलब्ध आहे.

२५ कॅटेगरी, विजेत्यांबाबत प्रचंड उत्सुकता
लोकमत DIA अवॉर्डसाठी हजारो जणांनी नॉमिनेशन केले होते. त्यामुळे विजेत्याच्या नावाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. फुड, पत्रकारिता, कोरिओग्राफी, ह्युमर, मोस्ट व्हायरल कंटेट, स्पिरिच्युअल, ब्युटी, ट्रॅव्हल, फॅशन, बॉलीवुड इन्फ्लएन्सर्स, फोटोग्राफी, म्युझिक, फिटनेस, डीजिटल क्रिएटर, स्पोर्टस, आर्ट- कल्चर,  प्रादेशिक सिनेमा, किडस, ऑटोमोबाईल, फायनान्स, लाईफस्टाईल यासारख्या २५ कॅटेगरी होत्या. ओरिजनल कंटेट, फॉलोअर्स, कॉमेंट, लाईक्स, व्हयूज या निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली.  फेसबुक, इन्स्ट्राग्राम, यूट्यूब, जाेश ॲप, टि्वटरवरील इन्फ्लुअन्सचा विचार करून लोकमत एडिटोरिअल बोर्डाकडून निवड केली जाणार आहे. 

Read in English

Web Title: Lokmat Digital Influencer Awards 2021: Millionaires on social media honored by 'Lokmat' today, the country's superstar digital influencers on a platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.