लोकमत दिवाळी मुखपृष्ठ स्पर्धा २०१६
By Admin | Published: September 18, 2016 04:31 AM2016-09-18T04:31:11+5:302016-09-18T04:31:11+5:30
लोकमतच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर मॉडेल म्हणून झळकण्याची सोनेरी संधी लोकमतने गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील तरुणींना व स्त्रियांना देऊ केली
नागपूर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचणाऱ्या लोकमतच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर मॉडेल म्हणून झळकण्याची सोनेरी संधी लोकमतने गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील तरुणींना व स्त्रियांना देऊ केली आहे. यंदाही ही परंपरा कायम राखत लोकमतने लोकमत दिवाळी मुखपृष्ठ स्पर्धा २०१६ करिता छायाचित्रे मागविली आहेत.
या स्पर्धेकरिता आपली छायाचित्र पुढील मापदंडानुसार पाठवणे अनिवार्य आहे. छायाचित्र हे क्लोजअप या प्रकारातले असावे. तुमच्या चेहऱ्याची विविध अँगल्समधील किमान ४ ते ५ छायाचित्रे पाठवावीत. त्यातील एका छायाचित्रात मॉडेलचा चेहरा समोरून दिसेल अशी मांडणी असावी. चेहऱ्याची फक्त एक बाजू (साईड पोज) दिसत असलेले एकच छायाचित्र पाठविल्यास ते रद्द ठरविले जाईल.
स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठवताना पुढील चुका टाळणे आवश्यक आहे. खूप दागिने वा भरजरी कपडे, साड्या घातलेली छायाचित्रे शक्यतो पाठवू नयेत. कारण त्यात मॉडेलचा चेहरा झाकला जाण्याची शक्यता असते. चष्मा किंवा गॉगल लावलेले छायाचित्र पाठवू नये कारण त्यात चेहरेपट्टी लक्षात येत नाही. एखाद्या ग्रूपमधल्या तुमच्या छायाचित्राचा मोबाईलने फोटो काढून पाठवू नये. छायाचित्रात मॉडेलच्या चेहऱ्यावर अॅटिट्यूड (भाव) दिसावा. छायाचित्र हे शक्यतो व्यावसायिक छायाचित्रकाराकडून काढून घेतलेले असावे. सेल्फी वा मोबाईलने काढलेली छायाचित्रे पाठवू नयेत तसेच मोबाईल किंवा संगणकावर चेहऱ्यावरचे दोष ‘दुरुस्त’ केलेली किंवा ‘सॉफ्ट लेन्स’ने काढलेली छायाचित्रे पाठवू नयेत.
निवड झालेल्या स्पर्धकांना नागपूरला बोलावून त्यांचे फोटोसेशन व्यावसायिक फोटोग्राफरकडून करून घेतले जाईल. निवड झालेल्या स्पर्धकांचा नागपूरला येण्याजाण्याचा खर्च लोकमत करील. जिचे छायाचित्र मुखपृष्ठासाठी निवडले जाईल तिला २१ हजार रुपये तर अन्य दहा जणींना प्रत्येकी ११ हजार रुपये पुरस्कार म्हणून दिले जातील. शिवाय त्यांच्या फोटोसेशनमधील १० छायाचित्रे त्यांना विशेष भेट म्हणून दिली जातील.
स्पर्धकांनी आपली छायाचित्रे ’ङ्म‘्िर६ं’्र2016@ॅें्र’.ूङ्मे या ईमेल आयडीवर पाठवावीत. कुरियर वा पोस्टाने पाठविलेली छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत. यासंदर्भात निवड समितीने निवडलेल्या मॉडेलविषयीची माहिती लोकमतमध्येच वृत्त स्वरुपात प्रसिद्ध केली जाईल. आपली छायाचित्रे ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी वरील ईमेल आयडीवर पाठवावीत.