लोकमत प्रतिनिधीसह पत्रकारांचे मोबाईल काढून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 03:00 PM2018-08-09T15:00:02+5:302018-08-09T15:04:54+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलनाचे छायाचित्रण करत असलेल्या लोकमत प्रतिनिधीसह काही पत्रकारांचे मोबाईल काढून घेण्यात आले.

lokmat employee and Journalists mobile phones removed by movements persons | लोकमत प्रतिनिधीसह पत्रकारांचे मोबाईल काढून घेतले

लोकमत प्रतिनिधीसह पत्रकारांचे मोबाईल काढून घेतले

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलकांनी मोबाईलमधील आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे जबरदस्तीने केली डिलिट काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलनाचे छायाचित्रण करत असलेल्या लोकमत प्रतिनिधीसह काही पत्रकारांचे मोबाईल काढून घेण्यात आले. आंदोलकांनी मोबाईलमधील आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे जबरदस्तीने डिलिट केली. 
मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते. हे आंदोलन शाांततेत पार पडल्यानंतर तिथे जमलेल्या आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा कक्षाच्या काचाही फोडण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसत बोंबाबोबही केली. यावेळी काही पत्रकार मोबाईलद्वारे याचे छायाचित्रण करत होते. लोकमतचे प्रतिनिधी राहूल गायकवाड हे छायाचित्रण करत असताना काही आंदोलकांनी त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला. मोबाईलमधील आंदोलनाशी संबंधित सर्व व्हिडिओ व छायाचित्रे डिलिट करून मोबाईल परत दिला. असाच अनुभव अन्य काही पत्रकारांनाही आला. काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न झाला.
-------------

Web Title: lokmat employee and Journalists mobile phones removed by movements persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.