‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’; ‘लोकमत’चा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 02:10 PM2020-08-27T14:10:05+5:302020-08-27T14:34:42+5:30
चांगल्या कामाचा होणार गौरव; गणेशोत्सव काळात लोकमतचा वाचकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम
सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमत समूहाने गणेशोत्सव काळात वाचकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ ‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’ असे या नव्या उपक्रमाचे नाव आहे़ हा कार्यक्रम २८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन होणार आहे़ या कार्यक्रमाचे पार्टनर्स इंडियन ऑईल सर्वो फ्युचुराजी प्लस व इंडियन ऑईल सर्वो स्कुटोमॅटिक ४ एसटी तर सहप्रायोजक एलजी. आणि स्टार प्रवाह हे आहेत.
गणपती बाप्पा आहे सर्व जगाचा विघ्नहर्ता़ सर्वच गणेशभक्तांकडून कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे़ जर या कोरोना काळात आपण स्वत:, आपले नातेवाईक किंवा आपल्या मंडळाने, सोसायटीने लोकांसाठी किंवा समाजाच्या मदतीसाठी काही केले असेल, अशा व्यक्तींना परीक्षकाच्या माध्यमातून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर त्या संदर्भातील कथा आम्हाला शेअर करा. एक छोटासा लेख, फोटोबरोबरच तुमच्या मंडळाचे, सोसायटीचे नाव, गाव, शहर, संपर्क क्रमांकासह आमच्या लोकमत कार्यालयात पाठवा़ या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, या उपक्रमात सर्वो स्कुटोमॅटिक ४ एसटी सेल्फी विथ बाप्पा ही स्पर्धाही घेण्यात येत आहे़ या स्पर्धेत गणेशभक्ताने बाप्पाबरोबर सेल्फी फोटो काढून आम्हाला पाठवायचा आहे़ शिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ती’चा मान देण्यासाठी महिलांनी केलेल्या पूजा, आरती आणि अनेक विधींचा फोटो काढून तोही आम्हाला शेअर करायचा आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअॅप करा किंवा response.lokmat@gmail.com यावर ई-मेल करा आणि प्रत्येक स्पर्धेचे विजेते जिंकतील आकर्षक बक्षिसे जिंकण्याची ही संधी गमावू नका. तर चला तर मग या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅप करा किंवा ई-मेलवर नोंद करा़
लोकमत विघ्नहर्ता इंडियन ऑईल सर्वो फ्युचुराजीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २८ ऑगस्ट २०२० रोजी सायं. ५ वाजता सहभागी होण्यासाठी http:bit.ly/vighnaharta28Aug या लिंकला जाऊन हा कार्यक्रम ऑनलाईन पाहा.
मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्याबरोबर गणेश उत्सवासाठीच्या नवनवीन पाककृती शिकणार आहोत. २८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता त्याचे थेट प्रक्षेपण लोकमतच्या फेसबुक पेजवर दिसणार आहे़ महिलांनी सहभागी होण्यासाठी http:bit.ly/LGwebinar28Aug या लिंकवर जाऊन जॉईन करायला विसरू नये.