'लोकमत गणेश महोत्सव २०२४'... गणेशोत्सवाच्या परिपूर्ण कव्हरेजसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 04:02 PM2024-09-07T16:02:00+5:302024-09-07T16:03:30+5:30
Ganesh Mahotsav 2024 : 'लोकमत'ने आपल्या वाचकांसाठी 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' मायक्रो साईट लाँच केली आहे.
Ganesh Mahotsav 2024 : मुंबई : आज सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नव्या उत्साहाचं आणि नवचैतन्य निर्माण करणारं वातावरण झालं आहे. आज राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने 'लोकमत'ने आपल्या वाचकांसाठी 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' मायक्रो साईट लाँच केली आहे. (येथे क्लिक करा)
गणेशोत्सवात लोक व्रत-उपवास करतात आणि मनोभावे लाडक्या गणपती पूजा-आरती करतात. त्यामुळं गणेश चतुर्थीचं महत्त्व, गणेश पूजा करण्याचा मुहूर्त, अनंत चतुर्दशी व्रताचं महत्त्व, गणेश विसर्जन मुहूर्त यासह गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला कोण-कोणता नैवेद्य दाखविला जातो, याबाबतची संपूर्ण माहिती 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे.
याचबरोबर, मुंबईतील लालबागचा राजा, श्रीमंत बाप्पा जीएसबी गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यासह राज्यातील विविध मंडळांच्या गणपतीचे लाईव्ह दर्शन गणेश भक्तांना एका क्लिकवर करता येणार आहे. तसंच, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. त्यासंबंधीही बातम्या, फोटो आणि व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत.
पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत 'लोकमत गणेश महोत्सव 2024'
— Lokmat (@lokmat) September 7, 2024
लाईव्ह दर्शन, दर्जेदार देखावे, कलाकारांचा बाप्पा, नैवैद्य रेसिपी, रंजक लेख, प्रश्न मंजुषा आणि आणखी बरेच काही...!
चला तर मग वाट कसली पाहताय? यंदाचा गणेशोत्सव साजरा करा 'लोकमत'च्या संगे
आजच https://t.co/aukhpoOrZU ला भेट द्या… pic.twitter.com/rhdP7IRPKl
पुढील दहा दिवसांच्या गणेशोत्सवात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहे. यासंबंधी बातम्या, फोटो आणि व्हिडिओ तसंच गणपती विसर्जनाबद्दल संपूर्ण माहिती 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' प्लॅटफॉर्म जाणून घेता येईल.