लोकमतने दिला होता माझ्या पहिल्या कवितेला पुरस्कार - नागराज मंजुळे

By Admin | Published: April 11, 2017 11:58 PM2017-04-11T23:58:30+5:302017-04-11T23:58:30+5:30

लोकमतनेच माझ्या पहिल्या कवितेला पुरस्कार दिला होता, असे मराठीतील आघाडीचे सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे

Lokmat had given my first poetry award - Nagraj Manjule | लोकमतने दिला होता माझ्या पहिल्या कवितेला पुरस्कार - नागराज मंजुळे

लोकमतने दिला होता माझ्या पहिल्या कवितेला पुरस्कार - नागराज मंजुळे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - लोकमतने माझ्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप दिली. लोकमतचे माझ्यावर पहिल्यापासूनच लक्ष होते. लोकमतनेच माझ्या पहिल्या कवितेला पुरस्कार दिला होता, असे मराठीतील आघाडीचे सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यावेळी सांगितले. 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरविण्यात आले. या सोहळ्यामध्ये नागराज मंजुळे यांना ट्रेंडसेटर एंटरटेन्मेंट पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी पुरस्काराबाबत आभार व्यक्त करताना नागराज यांनी लोकमतबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले  लोकमतचे माझ्यावर पहिल्यापासूनच लक्ष होते.  लोकमतने माझ्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप दिली. लोकमतनेच माझ्या पहिल्या कवितेला पुरस्कार दिला होता." 
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि  वैद्यकीय यामधील 14 जणांना आणि  स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .   
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.  
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.   

Web Title: Lokmat had given my first poetry award - Nagraj Manjule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.