लोकमत इम्पॅक्ट: जर्मनीतल्या ‘अरिहा’साठी राज्य महिला आयोगाची धाव, रुपाली चाकणकरांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:17 PM2022-07-29T20:17:34+5:302022-07-29T20:18:15+5:30

जमर्नीतील प्रशासनाच्या कुंपणात अडकलेली भारतीय तान्हुली अरिहाच्या मदतीसाठी राज्य महिला आयोगाने परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली आहे.

lokmat Impact State Women Commission came forward for Ariha shah in Germany | लोकमत इम्पॅक्ट: जर्मनीतल्या ‘अरिहा’साठी राज्य महिला आयोगाची धाव, रुपाली चाकणकरांनी घेतली दखल

लोकमत इम्पॅक्ट: जर्मनीतल्या ‘अरिहा’साठी राज्य महिला आयोगाची धाव, रुपाली चाकणकरांनी घेतली दखल

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव :

जमर्नीतील प्रशासनाच्या कुंपणात अडकलेली भारतीय तान्हुली अरिहाच्या मदतीसाठी राज्य महिला आयोगाने परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली आहे.  यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाला एक पत्र पाठविले  आणि अरिहा व तिच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या अन्यायाविषयी तत्काळ दखल घेण्याची मागणी केली.

जर्मनीमधील मुंबईतील भावेश व  धारा (अहमदाबाद) हे दाम्पत्य जर्मनीतील बर्लीन शहरात वास्तव्याला आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये शहा घरी  लेक जन्मली. सप्टेंबर २०२१ मध्ये अरिहाने  घातलेल्या डायपरवर रक्ताचे डाग दिसले. डायपर बदलताना तिच्या नाजूक जागी जखम झाल्याचे स्पष्ट झाले. संवेदनशीलपणाचा आव आणत अरिहाला पोलिसांपाठोपाठ ‘जर्मन चाईल्ड केअर सेंटर’च्या पथकाने ताब्यात घेतले. अरिहा एका जर्मन कुटुंबीयांकडे वास्तव्यास आहे. अरिहाला भारतीय संस्कृती व संस्कारापासून दूर केले जात असल्याचा आरोप होत आहे. अरिहा जैन परिवारातील असतानाही तिला मांसाहार पुरविला जात असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’ शहा दाम्पत्याच्या दु:खाला वाचा फोडली. राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली.विशाखापट्टणम येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सेमिनारमध्ये चाकणकर सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी चाकणकर यांनी अरिहा व तिच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेण्याविषयी चर्चाही केली. राज्य महिला आयोगाच्यारवतीने  सदस्य सचीव श्रद्धा जोशी यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

अरिहाच्या मदतीसाठी मी स्वत: वैयक्तिक लक्ष घालणार आहे.परराष्ट्र मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करु आणि भारतीय लेकीला सुखरुपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करु, असा विश्वास आहे.
-रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

रक्षा खडसेही सरसावल्या
दरम्यान, शहा कुटुंबीयांच्या मदतीसाठी खासदार रक्षा खडसेही सरसावल्या आहेत. अरिहाची आई धाराशी माझे सविस्तर बोलणे झाले आहे. धाराच्या व्यथा ऐकून मीही व्यथीत झाली आहे.यासंदर्भात  परराष्ट्र मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु असल्याचे खडसे यांनी सांगितले.

Web Title: lokmat Impact State Women Commission came forward for Ariha shah in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.