लोकमत विधीमंडळ पुरस्काराचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2016 09:23 PM2016-08-03T21:23:51+5:302016-08-03T21:40:12+5:30

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले

Lokmat Legislature award | लोकमत विधीमंडळ पुरस्काराचे मानकरी

लोकमत विधीमंडळ पुरस्काराचे मानकरी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - : ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. असे पुरस्कार देणारे ‘लोकमत’ हे पहिले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्याच्या निमित्ताने अनेक दिग्गज राजकारणी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय जुगलबंदी रंगली.  
 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, आजी-माजी सभाध्यक्ष व सभापती आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील लोकमत रिडर्स चॉईस अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आलं.
 
पुरस्काराचे मानकरी -
- लोकमत रिडर्स चॉईस अवॉर्ड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- जीवनगौरव पुरस्कार (विधानसभा सदस्य) - गणपतराव देशमुख
- जीवनगौरव पुरस्कार (विधान परिषद सदस्य) - शिवाजीराव देशमुख
- उत्कृष्ट नवोदित आमदार  (विधानसभा सदस्य) - अतुल भातखळकर
- उत्कृष्ट नवोदित आमदार  (विधान परिषद सदस्य) - राहुल नार्वेकर
- उत्कृष्ट महिला आमदार   (विधानसभा सदस्य) - वर्षा गायकवाड
- उत्कृष्ट महिला आमदार (विधान परिषद सदस्य) - निलम गो-हे
- उत्कृष्ट अभ्यासू वक्ता  (विधानसभा सदस्य) - प्रकाश आबिटकर
- उत्कृष्ट अभ्यासू वक्ता  (विधान परिषद सदस्य) - धनंजय मुंडे
 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
 
उत्कृष्ट नवोदित आमदार  (विधानसभा सदस्य) - अतुल भातखळकर
 
उत्कृष्ट महिला आमदार   (विधानसभा सदस्य) - वर्षा गायकवाड

उत्कृष्ट महिला आमदार (विधान परिषद सदस्य) - निलम गो-हे
 
 

Web Title: Lokmat Legislature award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.