'लोकमत साहित्य पुरस्कार' जाहीर; भालचंद्र नेमाडे यांना 'जीवनगौरव', १४ पुरस्कारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 12:05 PM2023-03-19T12:05:54+5:302023-03-19T12:09:36+5:30

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार, २३ मार्च रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ४:४५ वाजता करण्यात आले आहे. लोकमत साहित्य पुरस्कारांचे हे चौथे वर्षे आहे.

'Lokmat Literature Award' announced; Bhalchandra Nemade announced 'Life Honor', 14 awards | 'लोकमत साहित्य पुरस्कार' जाहीर; भालचंद्र नेमाडे यांना 'जीवनगौरव', १४ पुरस्कारांची घोषणा

'लोकमत साहित्य पुरस्कार' जाहीर; भालचंद्र नेमाडे यांना 'जीवनगौरव', १४ पुरस्कारांची घोषणा

googlenewsNext

मुंबई : साहित्यविश्वात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेले 'लोकमत साहित्य पुरस्कार' जाहीर झाले आहेत. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय साहित्यातील एकूण १२ प्रकारांसाठी विविध साहित्यिकांना 'लोकमत साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठाण्यात सोहळा
लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार, २३ मार्च रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ४:४५ वाजता करण्यात आले आहे. लोकमत साहित्य पुरस्कारांचे हे चौथे वर्षे आहे.

पुरस्कार विजेते लेखक व त्यांचे साहित्य
■ सुभाष अवचट (रफ स्केचेस, ललित)
■ चिन्मयी सुमित (विशेष पुरस्कार, मराठी शाळांसाठी कार्य)
■ नीरजा (थिजलेल्या काळाचे अवशेष, कादंबरी)
■ अनिल साबळे (डहाण, कादंबरी)
■ पं. सत्यशील देशपांडे (गान गुणगान, लक्षणीय)
■ विकास गायतोंडे (प्राक् सिनेमा, उत्कृष्ट मांडणी व मुखपृष्ठ)
■ पराग चोळकर (अवधी भूमी जगदीशाची, वैचारिक)
■ दासू वैद्य (बालसाहित्य)
■ रमेश इंगळे उत्रादकर (निर्वाणीचा शब्द, कविता)
■ अरुणा सबाने (सूर्य गिळणारी मी, आत्मचरित्र)
■ पंकज भोसले (विश्वामित्र सिण्ड्रोम, कथा)
■ गणेश मतकरी (चित्रपट प्रवाहाचा इतिहास - जागतिक आणि भारतीय, चित्रपट विषयक लेखन)
■ चंद्रकांत भोंजाळ (काश्मीरनामा, अनुवाद)

Web Title: 'Lokmat Literature Award' announced; Bhalchandra Nemade announced 'Life Honor', 14 awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत