लोकमत महामॅरेथॉन: ‘३० दिवस रनिंग चॅलेंज’चा उत्साह; नावनोंदणीसाठी आज शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 03:47 AM2020-11-30T03:47:20+5:302020-11-30T07:01:07+5:30

या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी प्रत्येक दिवशी २ किमी धावावे. धावतानाचा तुमचा फोटो लोकमत महामॅरेथॉन या फेसबुक पेजवर दररोज शेअर करावा.

Lokmat Mahamarathon: Enthusiasm for '30 Days Running Challenge '; Today is the last chance to register | लोकमत महामॅरेथॉन: ‘३० दिवस रनिंग चॅलेंज’चा उत्साह; नावनोंदणीसाठी आज शेवटची संधी

लोकमत महामॅरेथॉन: ‘३० दिवस रनिंग चॅलेंज’चा उत्साह; नावनोंदणीसाठी आज शेवटची संधी

googlenewsNext

औरंगाबाद : लोकमत महामॅरेथॉनतर्फे फिटनेससाठी आयोजित करण्यात आलेल्या ३० दिवस रनिंग चॅलेंज या नाविण्यपुर्ण उपक्रमाला अवघ्या महाराष्ट्रातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. १ डिसेंबरपासून रनिंगचा हा महाउत्सव सुरू होत आहे. त्यामुळे ज्यांना या उत्सवात सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा धावपटूंनी रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत  नावनोंदणी करणे गरजेचे आहे. दि. १ ते ३० डिसेंबर दरम्यान ३० दिवस रनिंग चॅलेंज हा उपक्रम होणार आहे. त्यामुळे संपूर्ण डिसेंबर महिनाच जणू लोकमत महामॅरेथॉन फिटनेस मंथ म्हणून ओळखला जाईल. उत्साह, साहस आणि नव्या उमेदीने हा उपक्रम निश्चितच भारावलेला असणार आहे. ३० दिवस रनिंग चॅलेंजमध्ये सहभागी होणे अत्यंत सोपे आहे. 

या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी प्रत्येक दिवशी २ किमी धावावे. धावतानाचा तुमचा फोटो लोकमत महामॅरेथॉन या फेसबुक पेजवर दररोज शेअर करावा. गच्ची, अंगण, मैदान असे तुम्हाला सोयीस्कर असेल तेथे कुठेही तुम्ही धावू शकता. प्रत्येक दिवसाचे फोटो काढून ते लोकमत महामॅरेथॉनच्या फेसबुक पेजवरील टाईमलाईनवर  आणि दिलेल्या लिंकवर शेअर करा.  उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला फिनीशर प्रमाणपत्र आणि एक आकर्षक मेडल मिळणार आहे. तसेच २० भाग्यवान विजेत्यांना महामॅरेथॉनतर्फे विशेष बक्षिस जिंकण्याची संधीही मिळणार आहे. त्यामुळे धावपटूंनो आणि फिटनेसप्रेमींनो आतापासूनच तयारीला लागा आणि आरोग्याविषयी जनजागृती करणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हा.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी-
उपक्रमात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/LMM30day या लिंकवर नावनोंदणी करावी. यासाठी २०० रूपये प्रवेश शुल्क असणार आहे. या शुल्कातील काही रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला मेडल, डीजिटल बीब, ई- प्रमाणापत्र, फिनिशर फोटो मिळणार आहे. 

Web Title: Lokmat Mahamarathon: Enthusiasm for '30 Days Running Challenge '; Today is the last chance to register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.