लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: राज्यातला कोणता राजकारणी ठरलाय मोस्ट प्रॉमिसिंग? तुमचं मत कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 05:06 PM2023-04-13T17:06:24+5:302023-04-13T17:06:57+5:30

राजकारण (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

Lokmat Maharashtrian of the Year 2023 Which politician is the most promising in the state vote now | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: राज्यातला कोणता राजकारणी ठरलाय मोस्ट प्रॉमिसिंग? तुमचं मत कुणाला?

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: राज्यातला कोणता राजकारणी ठरलाय मोस्ट प्रॉमिसिंग? तुमचं मत कुणाला?

googlenewsNext

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. राजकारण (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

हक्काचे पाणी मिळविण्यासाठी मैदानात
आ. अंबादास दानवे, उद्धव ठाकरे सेना, छत्रपती संभाजीनगर

उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक, औरंगाबाद महापालिकेत सभागृह नेता, जिल्हाप्रमुख, आमदार, विरोधी पक्षनेते असा अंबादास दानवे यांचा राजकीय प्रवास आहे. नवीन नेतृत्वाला संधी देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी स्पर्धेत नसतानाही अंबादास दानवे यांना विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी मैदानात उतरविले. कापसाला, उसाला भाव मिळावा म्हणून, गाईंच्या कत्तलीविरोधात शेकडो गाईंसह, वंदे भारत सभागृहासाठी, जायकवाडीतील हक्काचे पाणी मिळावे, यासाठी त्यांनी आंदोलने केली. २०१२ पासून बेवारस प्रेतांवर विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा उपक्रम आजही सुरू आहे. अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, कैद्यांचे पाल्य तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तींचे वाटप सुरू केले. दुसऱ्या फळीतील नेतृत्व करत आहेत.  
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

अभ्यासू आणि आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या नेत्या
आ. देवयानी फरांदे, मध्य नाशिक (भाजप)

घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या देवयानी फरांदे यांनी राजकारणात मिळालेल्या संधीचे सोने करत इथपर्यंत मजल मारली आहे. देवयांनी यांनी राजकारणात स्वत:ला सिद्ध करत वेगळा ठसा उमटवला आहे. नाशिक महापालिकेत १९९७ पासून त्या तीन वेळा सलग नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. २००९ ते २०१२ दरम्यान त्या नाशिकच्या उपमहापौरही होत्या. २०१४ आणि त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्या नाशिक मध्य मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या म्हणून त्या परिचित आहेत. विधानसभेत नाशिक आणि राज्यातील अनेक प्रश्न मांडणाऱ्या फरांदे यांनी वुमन फोरम, दुर्गा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगट तयार करून महिलांना संधी मिळवून दिल्या.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

...आणि आमदाराचा बॅटरी मार्च ठरला ऐतिहासिक 
आ. कपिल पाटील, जनता दल युनायडेट (शिक्षक भारती)

पत्रकार ते आमदार असा कपिल पाटील यांचा प्रवास थक्क करणारा आहे. लोकभारती नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. १६ वर्षे ते विधानपरिषदेचे आमदार म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या ते जनता दल युनायटेड पक्षाचा राज्यातील चेहरा आहेत. कॅपिटेशन फीविरोधी कायद्यासाठीचे आंदोलन, बीएड, डीएड विद्यार्थ्यांचे आंदोलन, सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणीसाठीचे आयोजन अशा सामाजिक लढ्यात ते सहभागी होते. रात्रशाळा वाचविण्यासाठी त्यांनी काढलेला बॅटरी मार्च ऐतिहासिक ठरला होता.  त्यांनी शिक्षकांना १ तारखेला पगार मिळवून दिला, महिलांना १८० दिवसांची मॅटर्निटी लिव्ह मंजूर करून घेतली. त्यांच्यामुळे नववी आणि दहावीचा विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या दर्जाचा बनवला गेला. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

मी मुंबई अभियान - अभिमानचा प्रणेता
आ. प्रसाद लाड, मुंबई (भाजप)

प्रसाद लाड विधानपरिषदेचे आमदार असून, ते विधानपरिषदेत भाजपचे प्रतोद आहेत. २०१६ पासून ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. पुण्यातील महालक्ष्मी तिरुपती एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष असून, या माध्यमातून ते बालेवाडी येथील चार हजार विद्यार्थ्यांची काळजी घेतात. लाड अध्यक्ष असलेल्या मी मुंबई अभियान - अभिमान या उपक्रमांतर्गत शेतकरी आठवडी बाजारसह अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातून १ कोटीहून अधिक नागरिक आणि पाच शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ‘आईचा डब्बा’ या उपक्रमांतर्गत अनेक महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला असून, याद्वारे परवडणाऱ्या किमतीत घरपोच अन्नाची गरज भागवली जाते, तसेच ६००० हून अधिक गरजूंना घरपोच वैद्यकीय मदत व औषध देण्यासाठी मोबाइल मेडिकल व्हॅनही त्यांनी सुरू केली आहे. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

संरक्षणार्थ अंमलात आणला दिशा कायदा
आ. यशोमती ठाकूर, तिवसा, जि. अमरावती (काँग्रेस)

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर सलग तीनदा अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. वडिलांच्या विचारांचा वारसा जोपासत यशोमती यांनी २००४ साली निवडणूक लढविली, मात्र; काही मतांनी त्यांचा पराभव झाला. २००५ ते २००९ या कालावधीत त्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य होत्या. दरम्यान, २००६ ते २०१० या कालावधीत पक्षाने त्यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या महासचिव पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली. ती त्यांनी समर्थपणे सांभाळत पक्षवाढीसाठी आपले योगदान दिले. महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण विकास, या खात्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, तसेच महिलांच्या संरक्षणार्थ अंमलात आणलेला दिशा कायदा त्यांच्या धाडसी निर्णयाची महाराष्ट्राला प्रचिती देणारा ठरला.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2023 Which politician is the most promising in the state vote now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.