LMOTY 2022 : अवंतिका नराळेची सोनेरी कामगिरी, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'ची ठरली मानकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 08:35 PM2022-10-11T20:35:22+5:302022-10-11T20:35:53+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022 to Avantika Narale, Lokmat Awards, Eknath shinde, Devendra Fadnavis, Nana Patekar, Ranveer Singh, Kiara Advani | LMOTY 2022 : अवंतिका नराळेची सोनेरी कामगिरी, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'ची ठरली मानकरी!

LMOTY 2022 : अवंतिका नराळेची सोनेरी कामगिरी, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'ची ठरली मानकरी!

googlenewsNext

गरीबीला मात देऊन पुण्याची अवंतिका नराळे ही ऑलिम्पिक पदाचे स्वप्न घेऊन धावत आहे. कुटुंबाची परिस्थिती बेताची असूनही ती मोठ्या स्पप्नाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तिच्या या संघर्षमय कार्याची दखल तिने महाराष्ट्राला घेण्यास भाग पाडली आणि म्हणूनच यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराची ती मानकरी ठरली. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

अवंतिकाची सुवर्ण कामगिरी... 

वडील प्लंबर, पाठीशी खंबीरपणे उभी असलेली आई, प्रशिक्षक नाही. आर्थिक बाजू कमकुवत, पण कठोर मेहनतीच्या जोरावर अवंतिका ऑलिम्पिकचा हिस्सा बनली. हॉगकाँग येथे २०१९ मध्ये झालेल्या युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अवंतिकाने सुवर्णपदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली. विशेष बाब म्हणजे केवळ ११.९७ सेकंद अशी विजयी वेळ देत १०० मीटर शर्यतीत बाजी मारत ती सर्वांत वेगवान युवा आशियाई धावपटू ठरली होती.  

याच स्पर्धेत अवंतिकाला २०० मीटर शर्यतीत २४.२० सेकंद अशा वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. खरं तर कबड्डी हे अवंतिकाचं पहिलं प्रेम. परंतु तिच्यातील गती पाहता प्रशिक्षक संजय पाटणकर यांनी तिला ॲथलेटिक्सकडे वळण्याचा सल्ला दिला. तिने हे ध्येय गाठण्यासाठी आठवीपासून ॲथलेटिक्सचा सराव सुरू केला. २०१८ मध्ये खेलो इंडिया स्पर्धेत अवंतिकाने १२.३६ सेकंदासह सुवर्ण जिंकले. घरातील कामाचा व्याप सांभाळून अवंतिकाचे वडील तिला नियमित सणस मैदानावर सरावासाठी घेऊन जात. २०२१ मध्ये २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत तिने १०० मीटरमध्ये ११.९४ सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण जिंकले.

दरम्यान, २३ वर्षांखालील स्पर्धेतही अवंतिकाने तिची सुवर्ण कामगिरी कायम ठेवली. यंदा हरयाणा येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीत अवंतिकाला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीत ११.८३ सेकंद अशी वेळ नोंदवून अवंतिकाने रौप्य पदक पटकावले. आगामी काळात अवंतिका भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्यांच्या शर्यतीत असणार आहे. भविष्यात ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न असून त्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचे २२ वर्षीय अवंतिकाने सांगितले.

Read in English

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022 to Avantika Narale, Lokmat Awards, Eknath shinde, Devendra Fadnavis, Nana Patekar, Ranveer Singh, Kiara Advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.