LMOTY 2025: कायद्याचं राज्य राहावं म्हणून धडपडणारे अधिकारी; कोण ठरणार प्रॉमिसिंग आयपीएस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:38 IST2025-02-26T17:37:18+5:302025-02-26T17:38:28+5:30
Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

LMOTY 2025: कायद्याचं राज्य राहावं म्हणून धडपडणारे अधिकारी; कोण ठरणार प्रॉमिसिंग आयपीएस?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, आयपीएस प्रॉमिसिंग या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....
डॉ. दीक्षित गेडाम (डीसीपी झोन ९, मुंबई)
- गेल्या काही महिन्यांत मुंबईतील वांद्रे व परिसरात झालेल्या अनेक संवेदनशील प्रकरणांचा तपास केला.
- सलमान खान गोळीबार प्रकरण,
- बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरण.
- सैफ अली खान हल्ला प्रकरण.
- उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हत्येचा अवघ्या काही तासांत उलगडा.
- रणवीर, रैनाची चौकशी प्रकरण.
- मुंबईत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या परिमंडळ ८ आणि आता ९ ची जबाबदारी ते सांभाळत आहेत.
महेंद्र पंडित (जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर)
- बॅच - २०१३
- राजकीय आणि सामाजिक संवेदनशील परिस्थितीत संयमाने काम करण्याची हातोटी.
- पोलिसांच्या कल्याणाकडे लक्ष, गृहबांधणी प्रकल्प पूर्ण करण्यात सातत्याने पाठपुरावा.
- प्रसिद्धीपासून दूर, राजकीय दबाव न घेता योग्य तथा कायदेशीर बाबी सांभाळत धडाडीने निर्णय.
- अनेक गुन्हे शोधण्याची यशस्वी मोहीम.
नवनीत कॉवत (जिल्हा पोलिस अधीक्षक, बीड)
- बॅच - २०१७
- आयआयटीमधून इंजिनीअर झाल्यानंतर एका आंतरराष्ट्रीय कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले.
- खंडणी, हत्या, आंदोलन, जातीय दंगलींमुळे सध्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात जिल्हा पोलिस प्रमुख पदाचा कार्यभार सांभाळला.
- पोलिसांतील दरी दूर व्हावी याकरिता सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांना आडनावाने हाक मारण्याची प्रथा बंद केली. त्यांच्यासह सर्व अधिकारी व शिपायांना पहिल्या नावाने हाक मारण्याची प्रथा सुरू केली.
- तक्रारदारांना योग्य व जलद पोलिस सेवा मिळावी म्हणून पोलिस ठाण्यांमध्ये क्यूआर सिस्टीम सुरू केली.
- लोणावळा येथे कार्यरत असताना गांजा तस्करीच्या देशपातळीवरील रॅकेटचा त्यांनी पर्दाफाश केला.
राकेश ओला (जिल्हा पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर)
- मूळ राजस्थान येथील असलेले ओला २००५ मध्ये न्यायाधीश होते.
- २०१२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत आयपीएस बनले.
- २२ ऑक्टोबर २०२२ पासून ते अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत. जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला.
- पोलिसांसाठी ६९३ निवासस्थाने मंजूर केली.
- राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या, नगर शहरातील राजकीय हत्या, अंगणवाडी सेविकेचा खून, शिर्डी येथील दुहेरी हत्याकांड हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून कायदा सुव्यवस्था राखली.
- अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी २०२३ मध्ये १२५, तर २०२४ मध्ये २२६ गुन्हे दाखल केले.
विशाल आनंद (दीनानाथ, जिल्हा पोलिस अधीक्षक, अमरावती)
- बॅच - २०१४
- अमरावती येथे जिल्हा पोलिस अधीक्षकपदावर रूजू होण्यापूर्वी ते नागपूर येथे नक्षलविरोधी अभियान विशेष कृती दलाचे अधीक्षक होते.
- गुटखा व वाळू तस्करांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत त्यांच्यावर वचक मिळवण्यात त्यांना यश आले.
- अनेक कारवायांमुळे जिल्ह्यातील बॉडी ऑफेन्सच्या प्रकारांना आळा घालण्यात त्यांना यश आले.
- एटीएम फोडणारी टोळी जेरबंद करण्यात मोठे यश त्यांनी मिळवले.
- पोलिसांमध्ये व्यसनमुक्ती व्हावी यासाठी ते विविध उपक्रम राबवत आहेत.
ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/