LMOTY 2025: वैद्यकीय क्षेत्रात जगभरात छाप पाडणाऱ्या या मुंबईकर डॉक्टरांपैकी कोण ठरणार महाराष्ट्रीयन ऑफ द इयर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:23 IST2025-02-27T12:21:39+5:302025-02-27T12:23:11+5:30
Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

LMOTY 2025: वैद्यकीय क्षेत्रात जगभरात छाप पाडणाऱ्या या मुंबईकर डॉक्टरांपैकी कोण ठरणार महाराष्ट्रीयन ऑफ द इयर?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, वैद्यकीय मुंबई या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....
डॉ. हरेश मेहता
(कार्डिओलॉजिस्ट -एस. एल. रहेजा हॉस्पिटल)
- गेल्या २७ वर्षांपासून कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत. कार्डिओलॉजी विभागात संचालक म्हणून कार्यरत असून मुंबईतील अन्य रुग्णालयांतही कन्सलटंट म्हणून काम पाहत आहे.
-३० हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर अँजिओप्लास्टी, ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना पेसमेकर बसविण्यात आले.
-हृदयविकारावर अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या १ हजार रुग्णांवर 'तावी' आणि २५ रुग्णांवर मिट्राक्लिप या प्रोसिजर त्यांनी केलेल्या आहेत.
-भारतातील विविध रुग्णालयांत जाऊन 'तावी' प्रोसिजर हृदयविकार तज्ज्ञांना शिकवित आहे.
-हृदयरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मेडिटेशन ट्रेनर म्हणून रुग्णांना प्रशिक्षण देत असतात.
डॉ. जुई मांडके
(पेडियाट्रीक सर्जन -सूर्या हॉस्पिटल)
-गेल्या २१ वर्षांपासून मुंबईतील प्रमुख रुग्णालयात त्या पेडियाट्रीक सर्जन बाल शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
-नवजात बाळावर, अगदी एक दिवसाच्या बाळापासून ते लहान मुलांवर लॅप्रोस्कोपीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करत आहेत.
-विशेष म्हणजे रोबोटिकच्या साहाय्याने लहान मुलांच्या विविध आजरांवर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.
-१० हजारांपेक्षा अधिक बालकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. गर्भात असलेल्या व्यंगाची तपासणी करण्याकरिता फिटलस्कोपीचा वापर.
-बालशल्यचिकित्सा संघटनेने बालशल्यचिकित्सावरील काढलेल्या पुस्तकात एक धडा लिहिला आहे.
-वैद्यकीय शाखेतील विविध परिषदांमध्ये सहभाग, त्यासोबत संशोधन निबंध प्रसिद्ध.
डॉ. नीलेश सातभाई
(हॅन्ड ट्रान्सप्लांट (प्लास्टिक) सर्जन -ग्लेनईगल्स हॉस्पिटल)
-ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये हॅन्ड ट्रान्सप्लांट आणि प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख.
-प्लास्टिक सर्जरीचा १८ वर्षाचा अनुभव. पाच वर्षात १३ रुग्णांवर २४ हातांचे प्रत्यारोपण केले.
-राज्यात सर्वाधिक हाताचे प्रत्यारोपण करणारे सर्जन.
-पश्चिम भारतात प्रथम दोन हातांचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. भारतात प्रथमच ज्या रुग्णाला दोन्ही हात आणि पाय नव्हते, अशा रुग्णावर दोन हातांचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया.
-आशियामध्ये प्रथमच आनुवंशिकतेमुळे जन्मापासून खांद्यापासून हात नसणाऱ्या रुग्णावर दोन हातांचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया.
-खांद्यापासून हात नसलेल्या सर्वात लहान मुलीवर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया.
डॉ. रवी मोहंका
(लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन)
-सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी विभागाचे चेअरमन, १५०० पेक्षा अधिक लहान आणि मोठ्या रुग्णांवर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी.
-२०० पेक्षा अधिक मेंदूमृत अवयदात्यांचे लिव्हर काढून घेण्याच्या (रिट्रिव्हल) शस्त्रक्रिया करण्यासाठी देशातील विविध भागांत दौरा.
-भारतातील पहिले आतड्याचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, पश्चिम भारतातील पहिले किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया. स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया.
-शहरातील मेंदूमृत रुग्णाचे अवयव घेऊन जाण्यासाठी प्रथमच रेल्वचा वापर, लिव्हरशी संबंधित रोबोटिकच्या साहाय्याने शस्त्रक्रिया. टायर -२ शहरातील रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न.
डॉ. श्रीरंग बिच्चू
(नेफ्रोलॉजिस्ट -बॉम्बे हॉस्पिटल)
-बॉम्बे रुग्णालयात नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक तसेच केंद्र सरकारच्या 'रीजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन'चे अध्यक्ष.
-सिडनी विद्यापीठातून नेफ्रोलॉजी शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ साली भारतात परतले. नेफ्रोलॉजी, डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणात ३० वर्षांचा
अनुभव.
-अपेक्स किडनी केअर संस्थेची स्थापना, भारतभर २२० डायलिसिस केंद्रांचे जाळे उभारले. याठिकाणी ६५% रुग्णांना डायलिसिससाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत नाहीत.
-अपेक्सने आतापर्यंत सुमारे ५० लाख डायलिसिस सत्रे पूर्ण केली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी 'अपेक्स स्कूल ऑफ डायलिसिस टेक्नॉलॉजी' संस्था सुरू केली. डायलिसिस टेक्निशियन व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवितात. आशियातील पहिले डॉमिनो-किडनी प्रत्यारोपण.
ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/