लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर" पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 06:03 PM2017-04-11T18:03:33+5:302017-04-11T18:23:40+5:30

महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या "महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर" पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे.

Lokmat "Maharashtrian of the Year" award commemorating the beginning | लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर" पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात

लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर" पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 -  या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या "महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर" पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. सुप्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री शर्वरी जेमनीस यांच्या गणेव वंदनेनं कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 
 
आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराच्या यंदाच्या संभाव्य विजेत्यांच्या चर्चेबरोबरच "जय महाराष्ट्रीयन"चा हुंकार पुन्हा घुमू लागला आहे. या कार्यक्रमात सन्माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 
यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट््स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
"लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
फेसबुक व लोकमत एकत्र येणं म्हणजे वाचकांसाठी पर्वणी
सोशल मीडियामधली जगातली अग्रेसर कंपनी फेसबुक आणि महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्र समूह ‘लोकमत’ एकत्र आले आहेत. मुंबईमध्ये रंगणाऱ्या या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण फेसबुकच्या साथीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
 
डिजिटल व सोशल मीडियाच्या वापरामध्ये तरुण पिढी आघाडीवर आहे. या माध्यमांचा कॉम्प्युटर व मोबाइलच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्यांमध्ये तब्बल ८० टक्के वाटा हा तरुणांचा आहे.
 
हा युवा वाचक प्रत्येक क्षणाला ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतो. हीच गरज ओळखून फेसबुक व लोकमत एकत्र आले आहेत, वाचकांना महाराष्ट्रीयन आॅफ द इयर हा पुरस्कार सोहळा लाइव्ह दाखवण्यासाठी... हा पुरस्कार सोहळा आहे सत्ता, कर्तृत्व आणि ग्लॅमरचा त्रिवेणी संगम.
 

सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा

http://lmoty.lokmat.com/vote.php

Web Title: Lokmat "Maharashtrian of the Year" award commemorating the beginning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.