पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस’

By admin | Published: March 4, 2017 01:12 AM2017-03-04T01:12:47+5:302017-03-04T01:12:47+5:30

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात लोक घर घेण्यास पसंती देत आहेत.

'Lokmat Property Showcase' will be organized in Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस’

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस’

Next


पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात लोक घर घेण्यास पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये दि. ११ व १२ मार्चला ‘लोकमत पीसीएमसी प्रॉपर्टी शोकेस २०१७’चे आयोजन केले आहे. त्यात शहर, मावळ, चाकण परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. फ्लॅट्स, बंगलोज, प्लॉट्स आणि शॉप्सचे एकाच ठिकाणी अनेक पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या प्रांगणात हे प्रदर्शन होत असून, ‘लोकमत’च्या वतीने दुसऱ्या वर्षी सलगपणे प्रॉपर्टी शोकेसचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडलगत चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, मावळ, खेड, आंबेगाव, राजगुरुनगर अशा विविध परिसरात नामांकित बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्प साकारत आहेत. नियोजनबद्ध विकासामुळे या भागात घर घेण्यास मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक प्राधान्य देत आहेत. स्वप्नातील घराला बळकटी देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. शेकडो मान्यवर प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. असंख्य आॅफर्स उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शन हॉल हा संपूर्णपणे वातानुकूलित यंत्रणेने सज्ज आहे.
नागरिकांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या उपक्रमाचे आऊटडोअर पार्टनर बिग इंडिया ग्रुप आणि प्रमोशनल पार्टनर प्रिमीअर प्लाझा हे आहेत. (प्रतिनिधी)
>लोकमत प्रॉपर्टी शो २०१७
दि. ११ व १२ मार्च २०१७
स्थळ : आॅटो क्लस्टर, चिंचवड
वेळ : स. ११ ते रात्री ८ वाजता
मोफत प्रवेश, वाहनतळ सुविधा

Web Title: 'Lokmat Property Showcase' will be organized in Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.