‘लोकमत’ला तीन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
By admin | Published: November 19, 2015 02:29 AM2015-11-19T02:29:16+5:302015-11-19T02:29:16+5:30
राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून, यात ‘लोकमत’ला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉ. मुझफ्फर हुसैन यांना
मुंबई : राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून, यात ‘लोकमत’ला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन
गौरव पत्रकारिता पुरस्काराने
सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख रुपये व मानचिन्ह
असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी २०१४ सालच्या जीवन गौरव आणि उत्कृष्ट पत्रकारितेसाठीच्या राज्यस्तरीय आणि विभागीय पुरस्कारांची घोषणा केली. १ डिसेंबर, २०१५ रोजी सायं. ६ वा. सह्याद्री अतिथीगृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
२०१४ साठीच्या राज्य आणि विभागीय स्तरावरील उत्कृष्ट पत्रकारितेची ‘लोकमत समूहा’ला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे :
राज्यस्तरीय पुरस्कार :
बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी): मुकेश रामकिशोर शर्मा, दै.लोकमत समाचार, गोंदिया. ४१ हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र).
विभागीय स्तरावरील पुरस्कार
ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग : इंदुमती गणेश (सूयर्वंशी), वार्ताहर-उपसंपादक, दै.लोकमत, कोल्हापूर; ४१ हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र).
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग : हर्षनंदन सुरेश वाघ, प्रतिनिधी, दै.लोकमत, बुलडाणा; ४१ हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) जाहीर झाले आहेत.