आज रंगणार ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’चा सोहळा, ‘पंचायत राज’साठी पहिलाच पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:02 AM2018-03-28T05:02:04+5:302018-03-28T05:02:04+5:30

गावाची शान असलेल्या राज्यातील १३ सरपंचांना बुधवारी ‘लोकमत सरपंच आॅफ द इयर’चा मुकुट प्रदान करण्यात येणार आहे़

The 'Lokmat Sarpanch Award' will be celebrated today, the first award for 'Panchayat Raj' | आज रंगणार ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’चा सोहळा, ‘पंचायत राज’साठी पहिलाच पुरस्कार

आज रंगणार ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’चा सोहळा, ‘पंचायत राज’साठी पहिलाच पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : गावाची शान असलेल्या राज्यातील १३ सरपंचांना बुधवारी ‘लोकमत सरपंच आॅफ द इयर’चा मुकुट प्रदान करण्यात येणार आहे़ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य सोहळ्यात ज्येष्ठ मंत्र्यांच्या हस्ते १३ सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे़
गावांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी ‘लोकमत’ने ‘सरपंच अ‍ॅवॉर्ड’ सुरू केले आहेत. सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा राज्यातील व पंचायत राज व्यवस्थेतीलही हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘बीकेटी टायर्स’ हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.
राज्यातील १८ जिल्ह्यांमधून या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल करण्यात आले होते़ त्यातील गाव बदलाची धडाडी घेऊन आश्वासक काम उभे करणाºया सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे़ जिल्हास्तरावरील विजेत्यांमधून राज्यस्तरावरील पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्यात आली होती़ आता राज्यस्तरावर नामवंत ज्युरी मंडळ राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी सरपंचांची निवड करणार आहेत.
बुधवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रणजीत पाटील यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ‘लोकमत’च्या एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत मीडियाचे मुख्य संपादक व ज्युरी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा
रंगणार आहे़
आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला ‘रणांगण’ सिनेमाचा नायक स्वप्निल जोशी व नायिका प्रणाली घोगरे, अभिनेत्री स्पृहा जोशी, तसेच बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित असतील. बापमाणूस टीव्ही मालिकेतील कलावंतही उपस्थित राहणार आहेत.

Web Title: The 'Lokmat Sarpanch Award' will be celebrated today, the first award for 'Panchayat Raj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.