Lokmat Sarpanch Awards 2018 : डॉ. मिलिंद पवार यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (वैद्यकीय) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 04:06 PM2018-03-29T16:06:04+5:302018-03-29T16:06:04+5:30

‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (वैद्यकीय) हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या सौंदाणे गावचे सरपंच डॉ. मिलिंद तुकाराम पवार यांना प्रदान करण्यात आला.  

Lokmat Sarpanch Awards 2018: Dr. Milind Pawar's 'Lokmat Sarpanch of the Year' (medical) award | Lokmat Sarpanch Awards 2018 : डॉ. मिलिंद पवार यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (वैद्यकीय) पुरस्कार 

Lokmat Sarpanch Awards 2018 : डॉ. मिलिंद पवार यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (वैद्यकीय) पुरस्कार 

Next

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (वैद्यकीय) हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या सौंदाणे गावचे सरपंच डॉ. मिलिंद तुकाराम पवार यांना प्रदान करण्यात आला.  

गट - वैद्यकीय
सरपंचाचे नाव - डॉ. मिलिंद तुकाराम पवार
गाव - सौंदाणे
तालुका - मालेगाव
जिल्हा - नाशिक

गावातील आरोग्य सेवांवर अधिक भर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डॉ. मिलिंद पवार मालेगाव तालुक्यातील सरकारी रुग्णालयांत दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदर महिलांसाठी विनामूल्य सेवा देतात. तसेच गावात विविध आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यात स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मधुमेह आदी आजारांची तपासणी करून औषधांचेही वाटप करण्यात येते. तसेच मोतीबिंदुसारख्या शस्त्रक्रियाही विनामूल्य करण्यात येतात.
गावातील बंधारपाडे आणि वागदेव माथा या आदिवासी वस्तींची पिण्याच्या पाण्याची समस्या डॉ. पवार यांनी कायमची सोडवली. या वस्तींवर पवार यांनी स्वखर्चाने बोअर उपलब्ध करून दिल्या. तसेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण, वैकुंठरथाची सोय आदी गोष्टीही पवार यांनी गावासाठी केल्या. डॉ. पवार यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावात वृक्ष लागवड, स्वच्छता अभियानेही राबविण्यात येतात.
कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी त्यांनी स्वत:च्या रुग्णालयात विशेष शिबीर आयोजित केले होते. त्यात तपासणी करण्यात आलेल्या ५० पैकी ६ महिलांनी गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले आणि हे उपचारही त्यांना सवलतीच्या दरात देण्यात आले.

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाख
पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. 
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

 

Web Title: Lokmat Sarpanch Awards 2018: Dr. Milind Pawar's 'Lokmat Sarpanch of the Year' (medical) award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.