‘लोकमत’चा खास व्यंगचित्र महोत्सव
By Admin | Published: May 1, 2016 03:43 AM2016-05-01T03:43:28+5:302016-05-01T03:43:28+5:30
व्यंगचित्र म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर येतात बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण असे ख्यातनाम व्यंगचित्रकार. या व अशा अनेक व्यंगचित्रकारांनी आपल्याला अनेक वर्षे आनंद दिला आहे.
मुंबई : व्यंगचित्र म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर येतात बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण असे ख्यातनाम व्यंगचित्रकार. या व अशा अनेक व्यंगचित्रकारांनी आपल्याला अनेक वर्षे आनंद दिला आहे. शब्दांतूनही जे मांडता येत नाही, ते कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी सादर करण्याची, प्रसंगी फटके मारणारी, खिल्ली वा टोपी उडवणारी आणि प्रसंगी कारुण्य व्यक्त करणारी व्यंगचित्रे ही जणू आपल्या आयुष्याचा भागच बनून गेली. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र समूहाने या वर्षी जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ‘व्यंगचित्र महोत्सवा’चे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
या व्यंगचित्रकार महोत्सवात नवोदित व व्यावसायिक व्यंगचित्रकारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोदित व व्यावसायिक व्यंगचित्रकारांनी स्वत: रेखाटलेले
ए-फोर आकाराच्या कागदावरील व्यंगचित्र ३ मे २0१६पर्यंत लोकमतच्या कार्यालयात प्रत्यक्ष आणून द्यावे
वा पाठवावे किंवा online@lokmat.com वर मेल करावे. त्यातील काही निवडक आणि उत्तम व्यंगचित्रे ‘लोकमत’च्या ५ मे रोजीच्या अंकात प्रकाशितही केली जाणार आहेत.
तर व्यंगचित्रकारांनो, हीच वेळ आहे नव्या लक्ष्मणरेषा उमटवण्याची!
पत्ता : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, १२०१, १२वा मजला, लोढा सुप्रीमस, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, मुंबई, ४०००१८. ०२२-२४८२००००