‘लोकमत टाइम्स’चा रिलाँच उपक्रम ‘बिकॉज लोकल इश्यूज मॅटर मोर’ला सुवर्ण पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:59 AM2023-09-15T10:59:11+5:302023-09-15T10:59:36+5:30
Lokmat Times: प्रतिष्ठित इंग्रजी दैनिक ‘लोकमत टाइम्स’ने येथे आयोजित ‘ग्लोबल कस्टमर एंगेजमेंट समिट अँड अवाॅर्ड’ सोहळ्यात सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार ‘लोकमत टाइम्स’चा उपक्रम ‘बिकॉज लोकल इश्यूज मॅटर मोर’ला वृत्तपत्र श्रेणीत देण्यात आला.
मुंबई : प्रतिष्ठित इंग्रजी दैनिक ‘लोकमत टाइम्स’ने येथे आयोजित ‘ग्लोबल कस्टमर एंगेजमेंट समिट अँड अवाॅर्ड’ सोहळ्यात सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार ‘लोकमत टाइम्स’चा उपक्रम ‘बिकॉज लोकल इश्यूज मॅटर मोर’ला वृत्तपत्र श्रेणीत देण्यात आला.
‘एशियन कस्टमर एंगेजमेंट फोरम अँड अवॉर्ड्स’च्या (एसीईएफ) बॅनरखाली झालेल्या या कार्यक्रमात देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. २०२२ मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून ‘लोकमत टाइम्स’ पुन्हा सुरू करण्याच्या निमित्ताने हा बहुआयामी उपक्रम सुरू करण्यात आला, ज्याचा मूळमंत्र होता, ‘‘आपण कुठेही राहत असलो तरी, स्थानिक मुद्दे आपल्यावर परिणाम करतात आणि मनाला भावतात.’’
‘लोकमत टाइम्स’च्या पुन्हा सुरू केलेल्या आवृत्तीची पहिली प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्या दिमाखदार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष व माजी राज्यसभा खासदार डॉ. विजय दर्डा, लोकमत मीडिया ग्रुपचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक व संपादकीय संचालक करण दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर आणि ‘लोकमत टाइम्स’चे संपादक एन. के. नायक उपस्थित होते.
प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यावर डॉ. विजय दर्डा म्हणाले, ‘‘वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे प्रेम आणि पाठबळ यामुळे आम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे.’’
नागपूरकरांच्या हृदयावर आणि मन जिंकण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना आणि रचना करण्यात आली आहे. सचिन घाणेकर आणि धीरज कुंजरू यांच्या नेतृत्वाखाली पर्पल फोकस प्रायव्हेट लिमिटेडने ती प्रत्यक्षात आणली.