लोकमत वुमेन समिटमध्ये आज उलगडणार ‘अस्तित्व ‘ती’च्या नजरेतून

By admin | Published: March 20, 2017 12:23 AM2017-03-20T00:23:21+5:302017-03-20T00:23:21+5:30

महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ बनलेल्या लोकमत माध्यमसमूहाने आयोजिलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’चे उद्घाटन

Lokmat Womens Summit will be unveiled today by the 'existence' of her | लोकमत वुमेन समिटमध्ये आज उलगडणार ‘अस्तित्व ‘ती’च्या नजरेतून

लोकमत वुमेन समिटमध्ये आज उलगडणार ‘अस्तित्व ‘ती’च्या नजरेतून

Next

पुणे : महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ बनलेल्या लोकमत माध्यमसमूहाने आयोजिलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’चे उद्घाटन ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक महेश भट, प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २०) होणार आहे. लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील. ‘अस्तित्व- तीच्या नजरेतून’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.
नॅशनल एग को-आॅर्डिनेशन कमिटी (एनईसीसी), युनिसेफ तसेच यूएन वुमेन यांच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समिट’चे हे सहावे पर्व असून सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही परिषद होणार आहे. महिला चळवळीकडे महिलांच्या नजरेतून पाहत पुढील मार्गाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
लोकमत सखी मंचाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचली आहे. या चळवळीचेच राष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या लोकमत वुमेन समिटशी आता महिलांच्या प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युनिसेफ आणि यूएन वुमेन (संयुक्त राष्ट्रसंघाची महिला शाखा) या संस्थाही जोडल्या गेल्या आहेत. लोकमत सखी मंचने आतापर्यंत महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर मूलगामी काम केले आहे.
विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कर्तबगारीला सलाम करण्यात येणार आहे. या वेळी युनिसेफच्या अ‍ॅडव्होकसी व कम्युनिकेशनप्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक, यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, अमेरिकन कॉन्सलेटच्या उप मुख्य अधिकारी जेनिफर लार्सन, आॅलिम्पिक कुस्तीपटू गीता फोगाट, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट, अभिनेता सुनील ग्रोवर, राजकीय समालोचक नीरजा चौधरी, व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देविता सराफ, अभिनेत्री दिव्या दत्ता, ज्येष्ठ समाजसेविका प्रीती पाटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या परिषदेचे सहयोगी प्रायोजक आर. डी. देशपांडे असून, असोसिएट प्रायोजक अजमेरा हाऊसिंग कॉर्पोरेशन, नॉलेज पार्टनर रोझरी ग्रुप आॅफ स्कूल, एज्युकेशन पार्टनर सिंहगड इन्स्टिट्यूट, हॉलिडे पार्टनर मँगो हॉलिडेज, टीव्ही पार्टनर एनडीटीव्ही प्राईम, ट्रॅव्हल पार्टनर रेव्हेल ग्रुप, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जे. डब्ल्यू. मेरियट, आऊटडोअर पार्टनर सुरेखा आऊटडोअर, लक्झरी पार्टनर आॅडी इंडिया, डिजिटल पार्टनर एक्स्चेंज फॉर मीडिया डॉट कॉम, ब्युटी पार्टनर आयएसएएस आहेत.
धोबीपछाड : नियमांच्या पल्याड
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती या खेळातील ‘धोबीपछाड’ आणि न उलगडलेले पैलू आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू गीता फोगाट उलगडणार आहे. - सहभाग - विजय दर्डा, उद्योजिका जान्हवी धारिवाल, एक्स्चेंज फॉर मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे. ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी- महिलांकडे पाहण्याचा माध्यमांचा दृष्टिकोन लैॆगिक समानता? - ‘बदल’ तिच्या नजरेतून प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या दत्ता आणि व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देविता सराफ.
पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव ‘स्वच्छतेतील कॉर्पोरेट भागीदारी - पालघरमधील अनुभव’ विषयाद्वारे निधी चौधरी मांडणार आहेत. महिलांच्या कळीच्या प्रश्नांवर राजेश्वरी चंद्रशेखर संवाद साधणार आहेत.
‘कपिल शर्मा शो’फेम अभिनेता सुनील ग्रोव्हर या समिटमधील खास आकर्षण आहे. ‘विनोदातील तिचे स्थान’ या विषयावर सुनीलमधील ‘ती’च्याशी संवाद साधला जाणार आहे.
‘युक्ती-तिच्याशी
होणाऱ्या चर्चेतून जन्माला आलेली संकल्पना’ या परिसंवादात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पाटकर, अमेरिकन कॉन्सलेटच्या मुंबईतील उप मुख्य अधिकारी जेनिफर लार्सन आणि अनुराग बात्रा सहभागी होणार आहेत.
च्बालकांच्या हक्कांबद्दल कार्यासाठी लोकमतसोबत सहकार्याचे महत्त्व - अलेक्झांड्रा वेस्टरबिक (चीफ आॅफ अ‍ॅडव्होकसी).
च्महिलांच्या प्रश्नावर यूएन वुमेनची भूमिका आणि जबाबदारी. - (सान्या सेठ, पॉलिसी अ‍ॅनालिस्ट, यूएन वुमेन)
च्सकस आहाराचा मेंदूला आणि बाळाच्या तब्येतीला होणारा फायदा यावर डॉ. सिमिन इराणी.
कर्तृत्वशालिनींचा होणार गौरव
विधायक पत्रकारितेचा वसा जपताना समाजातील मांगल्याला, सेवाभावाला वृद्धिंगत करण्यासाठी विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये गौरव होणार आहे. यंदाच्या वर्षीचा मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या नागपूरच्या कुमुद पावडे यांना व सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार महिलांच्या आर्थिक हक्कांसाठी लढणाऱ्या जळगावच्या इंदिरा पाटील यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी केली.
लोकमतच्या वतीने राज्यपातळीवर लोकमत सखी सन्मान पुरस्कारांचे वितरणही या वेळी होणार आहे. यंदाच्या वर्षीचे पुरस्कारार्थी असे : शैक्षणिक - कावेरी दीपक नागरगोजे (बीड), सांस्कृतिक - सुरभी संजय हांडे (भंडारा), क्रीडा - योगेश्वरी मिस्त्री (धुळे), सामाजिक - लीला इसो (नागपूर), कला आणि सांस्कृतिक - वैशाली पाटील (कोल्हापूर), शौर्य - राजलक्ष्मी शिवणकर (सांगली), व्यावसायिक - सुरक्षा शशांक घोसाळकर (मुंबई), आरोग्य - पद्मा अय्यर (पुणे).

Web Title: Lokmat Womens Summit will be unveiled today by the 'existence' of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.