लोकनेते विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

By Admin | Published: April 14, 2015 01:25 AM2015-04-14T01:25:03+5:302015-04-14T01:25:03+5:30

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक व लोकनेते राजे विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

Loknete Vikramsinh Ghatge passed away | लोकनेते विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

लोकनेते विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची नवी वाट तयार करणारे कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक व लोकनेते राजे विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते़ कागलवाडी परिसरातील राजघराण्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने साखर कारखानदारीतील ‘दीपस्तंभ,’ उमदा नेता व दिलदार राजा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे़
त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सुहासिनीदेवी, मुलगा व शाहू दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक समरजितसिंह, कन्या तेजस्विनी भोसले, बहीण बडोद्याच्या हर्षलाराजे गायकवाड, अमरावतीच्या रंजनाराजे देशमुख व जतच्या ज्योत्स्नाराजे डफळे, भाऊ प्रवीणसिंह असा परिवार आहे.
घाटगे यांना मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती. दोन-तीन दिवसांत धाप लागल्यासारखे वाटू लागल्याने सोमवारी त्यांनी डॉ. दिलीप कुलकर्णी यांची वेळ घेतली होती. मात्र सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली़ विक्रमसिंह घाटगे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. कागल विधानसभा मतदारसंघातून ते १९७८ व १९८० असे दोन वेळा आमदार झाले. पुढे १९९८ मध्ये त्यांनी कोल्हापूरातून लोकसभा लढवली. ( प्रतिनिधी)
विक्रमसिंह घाटगे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. कागल विधानसभा मतदारसंघातून ते १९७८ व १९८० असे दोन वेळा आमदार झाले. पुढे १९९८ मध्ये त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली; परंतु त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी साखर कारखानदारीत लक्ष केंद्रित केले होते़

राजर्षी शाहूंचे नातू...
कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे कागलचे घाटगे हे जनक घराणे. त्यामुळे विक्रमसिंह घाटगे हे नात्याने राजर्षी शाहू महाराज यांचे नातू. विक्रमसिंह यांचे आजोबा पिराजीराव घाटगे यांचे लहान भाऊ असलेले शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले. शाहू महाराजांचे कार्य आभाळाएवढे. त्यामुळे त्यांची उंची आपल्याला कधी गाठता येणार नाही; परंतु त्यांच्या मोठेपणाला बट्टा लागेल असा व्यवहार कधी माझ्या हातून होणार नाही, असे ते कायम सांगत आणि ते त्यांनी आयुष्यभर जपले.

Web Title: Loknete Vikramsinh Ghatge passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.