Loksabha Election 2019 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात कुठे-कुठे होणार मतदान?... संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 08:20 PM2019-03-10T20:20:37+5:302019-03-10T20:21:52+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे
आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातच महाराष्ट्रातील निवडणुकांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचार संहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्राच्या 4 पैकी पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रकिया 18 एप्रिल रोजी पार पडणार आहे. यावेळी 10 मतदारसंघात निवडणुका होतील.
महाराष्ट्रातील दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019
1 बुलडाणा लोकसभा मतदारसंघ
2 अकोला लोकसभा मतदारसंघ
3 अमरावती लोकसभा मतदारसंघ
4 हिंगोली लोकसभा मतदारसंघ
5 नांदेड लोकसभा मतदारसंघ
6 परभणी लोकसभा मतदारसंघ
7 बीड लोकसभा मतदारसंघ
8 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ
9 लातूर लोकसभा मतदारसंघ
10 सोलापूर लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकांच्या जाहीर तारखांनुसार राज्यातील दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, 14 मतदार संघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर उर्वरीत 17 मतदारसंघांमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.