भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:07 PM2024-06-10T18:07:18+5:302024-06-10T18:08:10+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी भुजबळांनी महायुतीला सल्ला दिला आहे. 

Loksabha Election Result - BJP big brother agreed, but we should get as many seats as Eknath Shinde - NCP Chhagan Bhujbal | भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ

भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ

मुंबई - Chhagan Bhujbal on Mahayuti ( Marathi News ) लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही असं सांगत राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी विधानसभेला शिंदेंना मिळतील इतक्याच जागा आम्हालाही मिळायला हव्यात असं विधान केले आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात भुजबळ बोलत होते. 

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आम्हाला कमीत कमी ८० जागा मिळाल्या पाहिजेत अशी मी म्हटलं, त्यानंतर ताबोडतोब माझ्याविरोधात हे असं नाही बोलायचे वैगेरे..बरं नाही बोलत. पण विधानसभेच्या जागांचा लवकर निपटारा करायला हवा. जागावाटप करून घ्या, त्यानंतर उमेदवारांचे काय ते ठरवा. भाजपा हा मोठा भाऊ आहे ते मान्य, पण आमचेही ४० आमदार आहेत. शिंदेंकडेही तेवढे आहेत. त्यामुळे त्यांना जितक्या जागा मिळणार तितक्या आम्हालासुद्धा मिळायला हव्यात. त्यावेळी शिंदेंचे खासदार जास्त म्हणून त्यांना जास्त जागा असं करू नका. सगळ्यांनी समजून काम करायला हवं असं त्यांनी म्हटलं. 

तसेच एकमेकांचे हात धरून सरकार स्थापन करू. भांडणे वैगेरे करू नका. सगळ्यांना उमेदवारी द्या. सर्व समाज घटकांचा विचार करून उमेदवारी द्यावी लागेल. दलित, आदिवासी यांच्या राखीव जागा आहेत त्यांचा प्रश्न ९९ टक्के सुटला आहे. परंतु बाकी जे भटके, विमुक्त, ओबीसी आहेत त्यांनाही आपल्यासोबत ठेवावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. दलित, मुस्लीम, आदिवासी, भटके विमुक्त हे सगळे मतदार आपल्यासोबत येतील असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागेल असंही छगन भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला १ मत दिले आहे. अख्ख्या भारतात अनेक ठिकाणी अपप्रचार झाला. फक्त महाराष्ट्रात नाही तर यूपीतही परिणाम झाला. इंडी आघाडी हे लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी झाले.  प्रत्येक समाजाला आपल्याला पुढे एकत्रित घेऊन जाऊ या, सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करूया. लोकसभेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली. माझा फोटो छापला तर मते कमी होतील असं काहींना वाटले. पण ती मते गेली आणि हीदेखील गेली. ठीक आहे. आपल्याला पुढे काम करायचे आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Loksabha Election Result - BJP big brother agreed, but we should get as many seats as Eknath Shinde - NCP Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.