लोकमतच्या फेसबुक पेजनं पार केला दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा, मराठी न्यूजविश्वात अग्रस्थान

By Admin | Published: May 6, 2016 03:13 PM2016-05-06T15:13:14+5:302016-05-06T18:53:38+5:30

महाराष्ट्रामध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या लोकमतवरचं वाचकांचं प्रेम डिजिटल क्षेत्रातही दिसून आलं आहे. लोकमतच्या फेसबुक पेजनं दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा आज 6 मे रोजी पार केला

Loksatta's Facebook Payans crossed the millionth Followers, leading to the Marathi newsweek | लोकमतच्या फेसबुक पेजनं पार केला दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा, मराठी न्यूजविश्वात अग्रस्थान

लोकमतच्या फेसबुक पेजनं पार केला दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा, मराठी न्यूजविश्वात अग्रस्थान

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - महाराष्ट्रामध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या लोकमतवरचं वाचकांचं प्रेम डिजिटल क्षेत्रातही दिसून आलं आहे. लोकमतच्या फेसबुक पेजनं दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा आज 6 मे रोजी पार केला असून, हा मैलाचा दगड पार करणारं मराठी वृत्तपत्रसृष्टीतलं हे पहिलं पेज ठरलं आहे.
वाचक केंद्रस्थानी ठेवून देण्यात येणारा मजकूर, निप:क्षपातीपणे करण्यात येणारी पत्रकारिता, मनोरंजन, क्रीडा, आरोग्य अशा सगळ्याच क्षेत्रातल्या बातम्यांसोबत माहितीपूर्ण लेखांना दिलेलं प्राधान्य आणि डिजिटल वाचकाची गरज ओळखून माहिती देण्यात दाखवलेली तत्परता  यांच्या संगमामुळेच वाचकांचं भरभरून प्रेम डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाभल्याचं दिसत आहे.
 
 
वाचकांची सकाळ प्रसन्न करणारं सुप्रभात, जेवण रुचकर बनवणाऱ्या रेसिपीज, थोरामोठ्यांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत, शाब्बास सुनबाईच्या टिप्स, पाण्याच्या प्रश्नी आपण काय करू शकतो यासारखे दाखवलेले मार्ग, संतांच्या, योद्ध्यांच्या, महावीरांच्या आमच्या महाराष्ट्राचं दर्शन, आयपीएलचा थरार किंवा सिनेमाच्या माध्यमातून रंगवली जाणारी चित्रपटसृष्टी अशा सगळ्या उपक्रमांना फेसबुकवरच्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने ते सहभागीही झाले.
 
त्यामुळे केवळ फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीतच नाही, तर पीपल टॉकिंगच्या संदर्भातही लोकमतचं फेसबुक पेज रोज लाखो वाचकांच्या सनिध्यात राहिलं.
 
 
वाचकांनी दाखवलेल्या या प्रेमाबद्दल लोकमत परीवारातर्फे सगळ्या वाचकांचे मनापासून आभार.
केवळ फेसबुक पेज नाही तर यू ट्यूब ( https://www.youtube.com/user/LokmatNews ), ट्विटर (@milokmat) आणि मोबाईल अॅप (https://goo.gl/Kn9Atq) अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर लोकमत आहे.

Web Title: Loksatta's Facebook Payans crossed the millionth Followers, leading to the Marathi newsweek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.