३ मार्चपासून लोणार महोत्सव
By Admin | Published: February 28, 2017 01:44 AM2017-02-28T01:44:15+5:302017-02-28T01:44:15+5:30
सिुधुताई सपकाळ, भारत गणेशपुरेंची उपस्थिती.
किशोर मापारी
लोणार , दि. २७- लोणार महोत्सव २0१७ ची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या महोत्सवासाठी अनाथांची आई सिंधूताई सपकाळ, अभिनेता भारत गणेशपूरेसह अन्य कलावंतांची उपस्थिती राहणार आहे.
३ ते ५ मार्च रोजी लोणार सरोवर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खार्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराविषयी जगामध्ये कुतुहल आहे. या सरोवराचा सर्वांंगीण विकास व्हावा, तसेच या सरोवराचे जतन व्हावे, या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, येथे युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या प्रमुख उद्देशासाठी लोणार नगरीतील नागरिकांनी लोणार महोत्सवाचे आयोजन २00६ पासून केले जाते. शासनान २00७ हा महोत्सव साजरा केला. मात्र त्यानंतर महोत्सव बंद करण्यात आला होता. तब्बल दहा वर्षाच्या खंडानंतर पुन्हा शासनाने हा महोत्सव सुरु करण्याचे ठरविले आहे. हा महोत्सव पर्यटन संकुलजवळ असलेल्या जागेमध्ये होणार आहे. ल्
लोणार महोत्सवाची सुरूवात ही ३ मार्च रोजी मॉ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथुन महोत्सव ज्योत घेउन लोणार येथे पोहचणार आहे. तर या महोत्सवाचे उदघाटन ३ मार्च रोजी सकाळी १0 वाजता मान्यवराच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच दिवशी सिंधुताई सपकाळ यांचे तसेच डॉ. स्मिता देशमुख यांचे व्याख्यान, सायंकाळी आनंदवन तुमच्यादारी समाजसेवक डॉ. विकास आमटे निर्मीत स्वरानंदनवन हा विशेष कार्यक्रम होणार आहे.