‘रामसर स्थळ’ यादीत सामील ‘लोणार’ला आता हवेत विकासाचे पंख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:48 AM2021-02-08T06:48:23+5:302021-02-08T07:32:34+5:30
लोणार व सरोवर परिसराचा विकास थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली होणार असल्याने विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा करता येऊ शकते.
काही दिवसांपूर्वी ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर जगप्रसिध्द लोणार सरोवर व परिसराला आता विकासाचे आणि पर्यटन वाढीसाठी मार्केटिंगचे पंख हवे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर पर्यटनप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोणार व सरोवर परिसराचा विकास थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली होणार असल्याने विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा करता येऊ शकते.
लोणारचे वेगळेपण काय?
सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने तयार झालेले बसॉल्ट खडकातील जगातील सगळ्यात मोठे व एकमेव विवर.
व्यास सुमारे १८३० मीटर. खोली १५० मीटर. वर्तुळाकार. परिघ सहा किमी. पाणी खारे.
महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणून अेाळख.
सरोवर व परिसराच्या खास बाबी
धारतीर्थ, गर्भगृहात तीन सावल्या पडणारे रामगया मंदिर.
पुरातन कमळजा मातेचे मंदिर.
१० हजार ५०० वर्षांपूर्वीची मंदिरे.
दैत्यसुदन मंदिर हे शिल्पकलेचा अद्भुत नमुना.
चुंबकीय तत्त्व असलेला झोपलेला मारोती.
पौराणिक/ऐतिहासिक महत्त्व
पद्म पुराण, स्कंद पुराण व विरज महात्म्यामध्ये लोणार गावाचा उल्लेख. पूर्वी वीरज तीर्थ तथा विष्णुगया म्हणून ओळखले जायचे. यादव काळातील काही मुख्य बाजारपेठेच्या शहरांमध्ये लोणारचे नाव होते. ३२ मंदिरे, १७ स्मारके, १३ कुंड, ४ पाण्याचे प्रवाह.
आव्हाने...
प्रदीर्घ कालावधीपासून लोणार दुर्लक्षित असल्याने आता सगळ्यांच्या नजरा.
विकासासाठी ११ ते १२ शासकीय यंत्रणांच्या समन्वयाचा लागेल कस.
नागपूर खंडपीठात दाखल याचिकेंतर्गत वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन.
असा होईल विकास...
एकूण विकास आराखडा २०५ कोटी रुपये. तीन ते चार टप्पे.
येत्या वर्षात १०७ कोटी ६३ लाख महाराष्ट्र सरकार देणार.
सरोवर परिसरात पदपथ निर्मिती, इलेक्ट्रिक वाहने सूचना फलक, परिसरातील वेडीबाभूळ काढणे, जैवविविधता जपणे ही कामेे.
सरोवरात जाणारे सांडपाणी थांबवून शहर परिसरात भूमिगत गटार योजना राबवणे.
एमटीडीसीअंर्गत संशोधन केंद्र, पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालयाची कामे.
जुन्या शासकीय इमारतींचे नूतनीकरण, व्ह्यू पॉइंट व पर्यटकांसाठी सुविधा.
पुरातत्त्व विभागांतर्गत गायमुख मंदिर, कुंडाचे संवर्धन.