लोणावळ्यात २४ तासात तब्बल २२९ मिमी पाऊस

By Admin | Published: August 6, 2016 09:40 AM2016-08-06T09:40:30+5:302016-08-06T09:40:30+5:30

लोणावळा शहरात पावसाचे थैमान सुरु असून शुक्रवारी सकाळी ८ ते आज शनिवारी सकाळी ८ या २४ तासात शहरात तब्बल २२९ मिमी (९.०२ इंच) पावसाची नोंद झाली आहे

Lonavala has received 229 mm rain in 24 hours | लोणावळ्यात २४ तासात तब्बल २२९ मिमी पाऊस

लोणावळ्यात २४ तासात तब्बल २२९ मिमी पाऊस

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत -
लोणावळा, दि. 6 - लोणावळा शहरात पावसाचे थैमान सुरु असून शुक्रवारी सकाळी ८ ते आज शनिवारी सकाळी ८ या २४ तासात शहरात तब्बल २२९ मिमी (९.०२ इंच) पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार व सोबत जोरदार हवा आजही सुरु आहे. जोरदार कोसळणार्‍या या पावसामुळे लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या भिंतीवरुन वेगात पाणी वाहत असून लोणावळा व तुंगार्ली ही धरणे पुर्ण भरली आहेत. 
 
शहरातील अनेक रस्त्यावर पाणी तुबूंन जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारी म्हणून लोणावळा पोलीस प्रशासनाने शनिवार व रविवार हे दोन दिवस पर्यटकांना लोणावळा, खंडाळा. कार्ला, भाजे व पवनानगर परिसरात बंदी केली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते व पुल पाण्याखाली गेले आहेत. काही भागात दरडी पडण्याचा धोका असल्याने लोणावळा व मावळवासीयांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे यांनी केले आहे.
 

Web Title: Lonavala has received 229 mm rain in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.