लोणावळा - मुस्लीमांनी पाकिस्तानच्या विरोधात केली निदर्शने

By Admin | Published: September 30, 2016 05:45 PM2016-09-30T17:45:45+5:302016-09-30T17:45:45+5:30

पाकिस्तानच्या नापाक कारवाया व उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेर्धात लोणावळा शहर मुस्लीम समाजाच्या वतीने आज शिवाजी चौकात निदर्शने करत हिंदुस्थान जिंदाबा

Lonavla - Muslims protested against Pakistan | लोणावळा - मुस्लीमांनी पाकिस्तानच्या विरोधात केली निदर्शने

लोणावळा - मुस्लीमांनी पाकिस्तानच्या विरोधात केली निदर्शने

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
लोणावळा : दि. ३०  - पाकिस्तानच्या नापाक कारवाया व उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेर्धात लोणावळा शहर मुस्लीम समाजाच्या वतीने आज शिवाजी चौकात निदर्शने करत हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, नवाज शरिफ मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व कायम राहिल पाकिस्तान सातत्याने भारताच्या विरोधात कारस्थाने करत राहिला आहे. पाकच्या या नापाक कारवाया व दहशतवादाला भारत कधिच भिक घालणार नाही. भारत हा अभेद असून येथिल मुस्लीम समाज हा भारतीय लष्कराच्या पाठिशी सदैव उभा राहिल असे सांगत उरी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रध्दांजली वाहिली.

यावेळी लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळ्याचे इमामसाहब मौलाना मोईनद्दिन खान असरफी, माजी नगरसेवक नासिर शेख, उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजु बोराटी, यशवंत पायगुडे, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, बाळासाहेब जाधव, निखिल कविश्वर, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल शेट्टी, संध्या खंडेलवाल, मुस्लीम समाजाचे अब्बास खान, जाबिर शेख, मुस्ताफ काटेवाडी, शकिल शेख, अँड. अस्पाक काझी, फिरोज बागवान, आरपीआय अल्पसंख्याक सेलचे मावळ तालुकाध्यक्ष तुपेलभाई शेख, यांच्यासह लोणावळ्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व मुस्लीम समाज यावेळी उपस्थित होता. राजकिय पदाधिकार्‍यांनी पाकचा निषेध करत शहिद जवानांना श्रध्दांजली वाहिली.

 

Web Title: Lonavla - Muslims protested against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.