कोल्हापुरातील टेंबलाईवाडीच्या मुलांना मिळतेय लंडनचे शिक्षण

By admin | Published: February 17, 2017 09:11 PM2017-02-17T21:11:04+5:302017-02-17T21:41:41+5:30

सुमारे १६६७साली स्थापन झालेल्या त्र्यंबोली विद्यालयात २०१२ पर्यंत तसा सुविधांचा वाणवाच होत. शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिकतात. त्यामुळे इमारत अपुरी पडायाची.

London's education is available to children from Tembaliwadi, Kolhapur | कोल्हापुरातील टेंबलाईवाडीच्या मुलांना मिळतेय लंडनचे शिक्षण

कोल्हापुरातील टेंबलाईवाडीच्या मुलांना मिळतेय लंडनचे शिक्षण

Next
ऑनलाइन लोकमत
 
कोल्हापूर, दि. 17 -  सुमारे १६६७साली स्थापन झालेल्या त्र्यंबोली विद्यालयात २०१२ पर्यंत तसा सुविधांचा वाणवाच होत. शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिकतात. त्यामुळे  इमारत अपुरी पडायाची. त्यात वीज नव्हती की पिण्याच्या पाण्याची सोय. अशा वेळी प्रिन्स्टन्स हॉस्पिटलमधल्या  डॉ. सचिन कुलकर्णी  यांच्याकडे संशोधनानिमित्त जेन कॉनव्हे यांचं येणं झालं. डॉ. कुलकर्णी हे टेंबलाईवाडीमध्येच राहतात. काही कारणामुळे जेन यांना या शाळेत जायचायोग आला. यावेळी  शाळेची अवस्था पाहून जेन यांना आश्चर्य वाटले व तिथल्या मुलांबद्दल आस्था निर्माण झाली. 
शाळेची अवस्था फारच बिकट होती अशा वेळी इथल्या सोयी-सुविधांविषयी जेन यांनी विचारणा केली व मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यामध्ये डॉ. कुलकर्णी यांनाही सहभागी करीत शाळेत पाणी शुद्धीकरण यंत्र, नवीन वर्गांची बांधणी करुन  पुस्तके भेट दिली, असे मुख्याध्यापक सुर्यकांत माने यांनी सांगितले.
शाळेतील मुले हुशार आहेत. घरची परिस्थती गरीब असल्याने तसेच शाळेतही फारश्या सुविधा नसल्याने त्यांच्या विकासात अडथळे येत होते. हे पाहून वाईट वाटले. या मुलांना इंग्रजीची तोंड ओळख करुन द्यावी या उद्देशाने लंडनमधील मार्टीन स्कूलशी संलग्नता मिळवून दिली. तसेच ज्युली टेलर व मिस शॉना या शिक्षकांनाही मुलांना शिकवण्यासाठी आणल्याचे  जेन यांनी सांगितले.
मुलांना बसण्यास बेंच नव्हते प्रिस्टिन वुमेन्स हॉस्पीटलने रोटरी क्लब आॅफ टेक्सटार्सल सिटी इचलकरंजीच्या मदतीने ५५ बेंच शाळेस भेट देण्यात आली, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
आत्तापर्यंत जेन दाम्पत्यांनी तीन हजार पौंडाच्या आसपास रक्कम शाळेच्या विकासासाठी खर्ची घातली आहे. शैक्षणिक गगुणवत्तेबरोबरच भौतिक सुधारणा जास्तीत जास्त कशा उपलब्ध करता येतील याकडे जेन दांम्पत्यांसह, प्रिस्टन हॉस्पीटलच्या डॉ. कुलकर्णी, डॉ. अजित पाटील, कॉनव्हे दांम्पत्यांसह शिक्षकांची धडपड सुरु असते.

 

Web Title: London's education is available to children from Tembaliwadi, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.